देशासाठी उत्तम कार्य करण्याचे ध्येय समोर ठेवले पाहिजे व विद्यार्थ्यांमध्ये ते रुजविले पाहिजे, असे मत प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले व सुधा नायडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सीबीएसई विभागाच्या शिक्षक वृंद यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
शिक्षिका सोनाली प्रधान यांनी स्वातंत्र्य लढ्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षितिजा खटावकर यांनी केले.
यावेळी संस्थेचे सर कार्यवाहक दिलीप बेलगावकर, संस्थेचे कार्यवाह हेमंत देशपांडे तसेच संस्थेचे पालक नितीन गर्गे व सीबीएसई विभागाचे अध्यक्ष आनंदी देशपांडे तसेच विभागाच्या मुख्याध्यापिका लीना चक्रवती व संस्थेच्या विविध विभागाच्या मुख्याध्यापिका, अध्यक्ष ,शिक्षक वृंद, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
छायाचित्र आर फोटोवर १७ विद्या प्रशाला