नाशिक : स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शाळा, महाविद्यालयांत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.शिवनेरी युवक मंडळ, पेठरोड येथील उन्नती युवक मित्रमंडळाच्या वतीने श्री जलाराम निवासी मतिमंद विद्यालयात मुलांना बिस्कीट व चॉकलेट वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सचिन ढिकले, रमेश सोनवणे, किशोर ढगे, नीलेश गुंजाळ आदि उपस्थित होते.शिवराज्य अभिषेक सेनाशिवराज्य अभिषेक सेनेचे मुख्य कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सेनेचे अध्यक्ष संतोष रखमे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दुपारी ३ वाजता त्र्यंबकेवर येथील ओम त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रम येथे अनाथ बालकांना फळे, पेढ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच याप्रसंगी येथे अन्नदानही करण्यात आले. अनाथ बालकांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जीवन साळुंखे, सेनेचे पदाधिकारी, अनाथ बालकाश्रमाचे संचालक फकिरराव अहिरे, आशाताई अहिरे, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदि उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिन चिरायु होवो...
By admin | Updated: August 18, 2016 23:32 IST