शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रीम कॅसल सिग्नलवर वाहनांचे वाढते अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:16 IST

नाशिक : मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल चौफुलीवर प्रतिदिन एक तरी छोटा वा मोठा अपघात होत असून, ही चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली आहे़

ठळक मुद्देमखमलाबाद रोड : पोलीस कर्मचाऱ्याची मागणी

नाशिक : मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल चौफुलीवर प्रतिदिन एक तरी छोटा वा मोठा अपघात होत असून, ही चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली आहे़चौफुलीवरील झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढरे पट्टे अस्पष्ट झालेले असून, रात्रीच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ या ठिकाणचे बहुतांशी अपघात हे वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे होत असलेले उल्लंघन व वाहनांचा वेग यामुळे झालेले आहेत़ त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे़ड्रीम कॅसल चौफुलीवर मखमलाबाद गावाकडून पंचवटीत जाणारे, पंचवटीतील मखमलाबाद नाक्याकडून मखमलाबादला जाणारे, चोपडा लॉन्सकडून येणारे तसेच ड्रीम कॅसलजवळील इमारतीकडून वाहनधारक येतात़ सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तिन्ही वेळेस या ठिकाणी गर्दी असते़ त्यातच सिग्नलला दिलेल्या वेळेतही मोठी तफावत असून, काही बाजूकडील वाहनांना जाण्यासाठी खूपच कमी कालावधी मिळतो़ त्यामुळे पाठीमागील वाहनधारक सिग्नल संपला तरी आपले वाहन दामटत असतात़ तर काही वाहनधारक सिग्नल सुटेपर्यंत प्रतीक्षादेखील करीत नाही़ड्रीम कॅसल इमारतीजवळ असलेल्या या चौफुलीवरील सिग्नलवर वाहतूक पोलीस हे क्वचितच दृष्टीस पडतात़ दिवसाचा ठरावीक पावत्यांचा कोटा संपला की ते निघून जातात़ मुळात सिग्नल हा स्वयंशिस्तीने पाळण्याची बाब आहे़ मात्र, जोपर्यंत दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत वाहनचालक सुधारणार नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे किमान महिनाभर तरी या ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त करून वाहनधारकांना शिस्त लावण्याची मागणी केली जाते आहे़

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक