शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बदली प्रक्रियेने वाढली धडधड

By admin | Updated: January 10, 2016 00:09 IST

महापालिका : अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी तयार

नाशिक : महापालिकेत वर्षानुवर्षांपासून एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाने तयार केली असून, त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दि. ४ ते ११ जानेवारी या कालावधीत त्यांच्या टेबलवरील संचिकांची यादी तयार करण्याचे आदेश यापूर्वीच काढण्यात आले असल्याने प्रशासनाकडून मकर संक्रांतीपूर्वीच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाती बदली आदेशाचा तीळगूळ ठेवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महापालिकेत एकाच ठिकाणी ठरावीक कालावधी होऊनही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. संजय खंदारे यांच्या कार्यकाळात काही प्रमाणात बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर आता आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रशासकीय साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. एकाचवेळी बदलीसत्र राबविले जाणार असल्याने पदभार हस्तांतरणाच्या वेळी प्रशासकीय कामकाजात काही अडथळे निर्माण होऊ नये, म्हणून दि. ४ ते ११ जानेवारी या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या टेबलवरील सर्व संचिकांची यादी तयार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, मागील आठवड्यात अधिकारी व कर्मचारी त्यांच्या टेबलवरील संचिकांची यादी तयार करण्यात व्यस्त होते. महत्त्वाची शासकीय कागदपत्रे, फोटो अल्बम, सीडी, मूल्यवान दस्तावेज, संचिकेत नसलेले नकाशे यांचीही स्वतंत्र यादी करण्याची सूचना असल्याने अनेकांच्या कार्यालयात फाईलींचा ढीगही साचलेला दिसून आला. संचिकांची यादी तसेच अन्य कागदपत्रांच्या नोंदी तयार करण्याचे काम सोमवारपर्यंत (दि.११) संपवायचे असल्याने काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या शनिवारच्या सुटीच्या दिवशीही महापालिकेत हजेरी लावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे संकेत आयुक्तांनी दिले असल्याने अधिकारी व कर्मचारी यांची धडधड वाढली असून, आस्थापना विभागात संपर्क साधून चाचपणी केली जात आहे. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रकृतीचेही कारण पुढे केल्याचे समजते; परंतु प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने अनेकांची अडचण झाली आहे. (प्रतिनिधी)