शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ठेंगोडा परिसरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

By admin | Updated: October 30, 2014 22:57 IST

ठेंगोडा परिसरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

ठेंगोडा : परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परिसरात वर्षभरातील चोरीच्या घटनांची आकडेवारी बघितल्यास हा आकडा डझनाच्या वर जाईल मात्र अशा प्रकारे होतं असलेल्या चोऱ्यांच्या घटनांनंतर पोलीस यंत्रणेकडून छेडा लावला जात नसल्यामुळे पोलीस पंचनामा करून केवळ कारवाईचा फार्स करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.चोरीच्या घटना घडल्या म्हणजे पोलीस येऊन पंचनाम्याचा फार्स पूर्ण करतात; मात्र घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे चोरांचे फावते. घरातील सर्व सदस्य बाहेर गावी गेल्यावरच कुलूप तोडून चोरी झाल्याचे आजपर्यंतच्या सर्व चोरी प्रकरणात घडले आहे. आजपर्यंत बाजारपेठेतील आनंदा शेठ यांच्या घरात, शहा बंधू यांच्या घरात, शॉपिंग सेंटरमधील बापू शेवाळे यांच्या इलेक्ट्रिक दुकानात आदि ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. ठेंगोड्यात लहान मोठ्या चोऱ्यांचे सत्र होणे नित्याचा भाग झाला आहे. दीपावलीच्या दिवशी येथील प्रवीण रहाणे हे कुटुंबासह बाहेर गावी गेले असताना रात्री चोरांनी लोखंडी कपाट उघडून सोन्याची अंगठी व रोख रक्कम चोरून नेली. पोलिसांनी नेहमीप्रमाणे पंचनामा केला असून, तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलीस यंत्रणेने ठेंगोड्यात जरब बसवून कायदा सुव्यवस्थेचे वातावरण तयार करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)नगर हत्त्याकांडाचा निषेधमालेगाव : नगर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाचा महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागातर्फे निषेध करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित दोषींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघटनेतर्फे येथील महसूल प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे धर्मा म्हसदे, कुणाल शिंपी, रहेमत पठाण, डॉ. मनोहर जगताप आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)