शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालाची आवक वाढली शेतीमालाची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST

नाशिक : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. कोरोनामुळे मागील वर्षांपासून ...

नाशिक : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. कोरोनामुळे मागील वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, यावर्षी शेतीच्या मशागतीबरोबरच खते आणि बियाण्याचे दरही वाढले असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यासाठी वेळेवर कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी

नाशिक : मागील काही दिवसांत कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप पूर्ण धोका टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी यापुढील काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून शासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तरुणांना मिळू लागला रोजगार

नाशिक : शहरातील बार चालकांना ऑनलाइन मद्य विक्रीची परवानगी मिळाल्याने अनेक तरुणांना रोजगार मिळू लागला आहे. घरपोहोच सेवा दिली जात असल्याने अनेक बारचालकांनी डिलेव्हरी बॉयची नेमणूक केली आहे. त्यामुळे अनेकांचा आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

दुकानांच्या वेळेमुळे गैरसोय

नाशिक : किराणा मालाची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहात असल्याने अनेक नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी दुकानात जाणे शक्य होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. दुकानांची वेळ वाढविण्याची मागणी होत आहे.

नवीन भागात जाताना चिंता

नाशिक : शहरातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने नवीन परिसरात जाण्याबाबत नागरिक विचारपूर्वक निर्णय घेत असल्याचे दिसून येते. ज्या परिसरात जायचे आहे तेथे रुग्णांची स्थिती काय आहे, याबाबत चौकशी केल्यानंतरच अनेक जण निर्णय घेतात. यामुळे अनेकांचा परिसरातील वावर कमी झाला आहे.

फळांची विक्री वाढली

नाशिक : रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध फळ खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यामुळे शहरात फळांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. फळांचे दरही यामुळे वाढले आहेत. फळांची दुकानेही पूर्णवेळ सुरू नसतात, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते.

गावागावात लसीकरणासाठी प्रबोधन

नाशिक : जिल्ह्याच्या सर्वच भागात रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आपल्या गावात शंभर टक्के लसीकरण व्हावे, यासाठी गावागावातील कर्ती मंडळी कामाला लागली असून, याबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. त्याचबरोबर गावातच लसीकरण मोहीम राबविण्याबाबत नियोजन केले जात आहे.