शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलामुळे आजाराचे वाढले प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:50 IST

वातावरण बदलाचा फटका पुन्हा नाशिककरांना बसू लागला आहे. अचानकपणे वातावरणात बदल होऊन दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडी जाणवत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

नाशिक : वातावरण बदलाचा फटका पुन्हा नाशिककरांना बसू लागला आहे. अचानकपणे वातावरणात बदल होऊन दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडी जाणवत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.  वातावरण बदलामुळे शहरात पुन्हा सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. नागरिकांना दिवसा आॅक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. शहराचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे व किमान तपमान २० अंशांच्या आसपास राहत होते; मात्र मंगळवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा थेट १३.४ अंशांवर घसरला. हवामान बदल आणि शहरात वाढती अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणाही सुस्तावल्यामुळे औषध फवारणी, स्वच्छता होत नसल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष देऊन आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. शक्यतो फ्रिजमधील पाणी पिणे, आइस्क्रीम खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, तळलेले पदार्थ खाऊ नये, दिवसा उन्हात फिरताना नाकातोंडाला रुमाल लावावा, डोक्यावर टोपी परिधान करावी, संध्याकाळीदेखील बाहेर फिरताना काळजी घ्यावी, दुचाकीवरून प्रवास करताना नाका-तोंडाला रुमाल लावावा व कानात कापसाचे बोळे ठेवावे, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.बालकांच्या आरोग्य जपाबदलत्या हवामान व ऋतुमानामुळे नागरिकांनी बालकांचे आरोग्यही जपण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर बदलत्या हवामानाचा लवकर परिणाम होत असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये जर कोणाला सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर त्या व्यक्तीपासून बालकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.