नाशिक : घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी धरणांमध्ये वळवण्याच्या महत्त्वाकांक्षी वळण योजना प्रकल्पामुळे भविष्यात सुरगाणा व दिंडोरी तालुक्यांतील धरणे पूर्ण क्षमतेने भरणार असून, या प्रकल्पामुळे येथील तालुक्यातील शेतकऱ्यांनाही बारमाही पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. सुरगाणा व दिंडोरी तालुक्यांतील वळण योजना प्रकल्पांची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी आमदार जिवा पांडू गावित, मेरीचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार, अधीक्षक अभियंता ए. बी. कोकटे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, कार्यकारी अभियंता गिरीश संघाने, तहसीलदार यू. के. मोरे, एम. जी. कनोजे आदि उपस्थित होते. यावेळी बागडे म्हणाले की, वळण योजना प्रकल्पामुळे जिल्'ाचे नंदनवन होणार आहे. शेतीला बारमाही पाण्याची गरज असून, स्थानिक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बागडे यांनी झार्लीपाडा, गोळशी महाजे, हट्टीपाडा, मांजरपाडा वळण योजनेच्या कामांची पाहणी करून उर्वरित कामे लवकर होण्याच्यादृष्टीने सूक्ष्म नियोजनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच या वळण योजना प्रकल्पांच्या माध्यमातून किती पाणी वळविले जाईल व किती साठविले जाईल याची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. स्थानिक लोकांशी चर्चा करताना त्यांना उद्भवणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
धरणाच्या पाणी क्षमतेत वाढ
By admin | Updated: June 20, 2015 01:33 IST