शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतचा अभ्यास वाढावा

By admin | Updated: December 27, 2015 22:53 IST

लीना हुन्नरगीकर : संस्कृत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन; ३१ पर्यंत रंगणार स्पर्धा

नाशिक : संस्कृत नाट्य स्पर्धेतून नाटकांच्या सादरीकरणाबरोबरच संस्कृत भाषेचा अभ्यास, संशोधन वाढावे, नाटकांतून मनोरंजनासह समाजाचे उद्बोधनही व्हावे, अशी अपेक्षा प्रा. डॉ. लीना हुन्नरगीकर यांनी व्यक्त केली. पंचावन्नव्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आजपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. ३१ डिसेंबरपर्यंत स्पर्धा चालणार आहे. नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम अध्यक्षस्थानी होते. परीक्षक श्रीनंद बापट, अंजली पर्वते, तरंगिणी खोत, समन्वयक राजेश जाधव, मीना वाघ उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. हुन्नरगीकर म्हणाल्या, पूर्वी नाटकांतून रुढी-परंपरांविरोधात प्रबोधन केले जात असे. आतादेखील रंजनासह प्रबोधनावर भर द्यायला हवा. संस्कृत स्पर्धेमुळे भाषेला फायदा होत असल्याचेही त्या म्हणाल्या. रवींद्र कदम यांनी जगातील पहिली रंगभूमी नाशिक असल्याचे सांगितले. रामायणकाळात चेहऱ्याला रंग लावून, वेशांतर करून सीतेचे अपहरण या भूमीतून झाले. अशा भूमीत भाषेची जननी असलेल्या संस्कृत भाषेतील नाट्यस्पर्धा होणे हा चांगला योग असल्याचे ते म्हणाले. वेदांग जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विद्याधर निरंतर, भगवान हिरे, अरुण गिते यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सुरेश गायधनी, माणिक कानडे, रोहित पगारे उपस्थित होते. स्पर्धेत उद्या (दि. २८) नदीसूक्तम, वक्रतुंड, ऐकक संघ, कथा वार्धक्सस्य इयम ही नाटके होणार आहेत. उद्या होणारे ‘सुंदरा’ हे नाटक रद्द झाल्याचे सांगण्यात आले.