शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ

By admin | Updated: September 2, 2014 01:11 IST

महामार्गावर खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ

 

नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे या ५० क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर नांदूरशिंगोटे ते सिन्नर या वीस किलोमीटरच्या अंतरावर प्रचंड खड्डे पडल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे. अनेकदा मागणी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यांचा आकार मोठा झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाल्याने ते अपघातांना निमंत्रण देणारे ठरू लागले आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास परिसरातील दोडीपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पावसामुळे महामार्गाची जणू चाळण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात महामार्गावर खड्डे पडतात. विशेष म्हणजे हा महामार्ग पुण्यापासून थेट नांदूरशिंगोटे जवळील एक किलोमीटरपर्यंत सुस्थितीत आहे. मात्र तेथून पुढे नाशिककडे मोठी दुरवस्था झाली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दरम्यानचा सुमारे ४१ किलोमीटरचा रस्ता अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे त्याची या पावसाळ्यात आणखीच दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. येथील निमोण नाका व चास नाका येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ग्रामस्थ, शाळकरी मुले, व्यापारी यांचे हाल होत आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होतात. तसेच खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे मात्र अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय कार्यालय संगमनेर येथे असून, नाशिक अथवा पुण्याकडून येणारे अधिकारी याच रस्त्याने जातात. तसेच या रस्त्याने मालवाहतूक करणारे ट्रक, प्रवासी वाहने, खासगी बस, राज्य परिवहन विभागाच्या बसेस, पर्यटकांचे खासगी वाहने व दुचाकी यांची संख्या लक्षणीय असून, हा महामार्ग रात्रंदिवस सुरू असतो. नांदूरशिंगोटे येथे सिन्नर बाजार समितीचे उपबाजार आवार असून, येथे सोमवारी व शुक्रवारी बाजारासाठी गर्दी होते. कांद्याचे मालट्रक भरून देशात विविध ठिकाणी पाठविण्यात येतात. मात्र खड्ड्यांमुळे अवजड वाहनांचे नुकसान होत असल्याने वाहनचालक वाहनातून माल घेऊन जाण्यास नकार देतात. त्यामुळे व्यापारीही अडचणीत येत आहेत. (वार्ताहर)