शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
2
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
3
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
4
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
5
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली
6
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
7
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
8
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
9
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
10
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
11
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
12
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
13
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
14
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
15
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?
16
"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."
17
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
18
इरफान खानच्या 'द लंचबॉक्स'चा सीक्वेल येणार? 'हा' अभिनेता साकारु शकतो भूमिका
19
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
20
प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?

निसर्गनगरमध्ये लुटीच्या घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 22:41 IST

अंधाराचा फायदा : मद्यपींचा सुळसुळाट, पोलीस गस्त वाढविण्याची मागणी

पंचवटी : दिंडोरी रोडवरील कलानगर, निसर्गनगर, शिवगंगानगर परिसरातील मोकळ्या भूखंडांवर रात्रीच्या सुमारास टवाळखोर युवक खुलेआम मद्यपान करत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या युवकांकडून महिला व मुलींची छेडछाड काढली जात असून, रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन लुटमारीच्या घटनाही घडल्या आहेत़ अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले असून, पोलीस गस्तीची मागणी केली जात आहे़ दिंडोरी रोडवरील कलानगरच्या पुढे निसर्गनगर व शिवगंगानगर समोरासमोर आहे़ या परिसरात अनेक मोकळे भूखंड असून, त्यांचा वापर टोळक्यांकडून मद्यपानासाठी केला जातो़ या ठिकाणच्या मोकळ्या जागांना अक्षरश: खुल्या बिअरबारचे स्वरूप प्राप्त झाले आहे़ विशेष म्हणजे या ठिकाणी बसलेल्या युवकांना नागरिकांनी टोकल्यास ते शिवीगाळ करून धमक्याही देत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ तसेच या टोळक्यांमध्ये बहुतांशी गुन्हेगारी टोळक्यांशी संबंधित असल्याचे नागरिक सांगतात़महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने शिवगंगानगरमधील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोतही दुचाकीस्वारांनी खेचून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती़ या परिसरात पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी पूर्णत: अंधार असतो़ या वेळात दुचाकीवर जाणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांची लूट केल्याची घटना अवघ्या आठवड्यापूर्वी घडली होती़ पोलिसांनी निसर्गनगर, शिवगंगानगरमध्ये मद्यपान करण्यासाठी येणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे़ रात्रीच्या वेळी पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी, तसेच मद्यपान करणारे, छेडछाड करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेकडो त्रस्त नागरिकांनी केली आहे़ (वार्ताहर)