शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी प्रतिबंधित क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:39 IST

मालेगाव : शहरात कोरोनाच्या बळींबरोबरच बाधितांच्याही संख्येत होणारी वाढ लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

मालेगाव : शहरात कोरोनाच्या बळींबरोबरच बाधितांच्याही संख्येत होणारी वाढ लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात प्रारंभी सात प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेमेंन्ट झोन) तयार करण्यात आले होते. शनिवारी या झोनमध्ये वाढ करण्यात आली असून, शहरात रुग्णसंख्या वाढल्याने आता एकूण १३ प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहेत.  उत्तर महाराष्टÑात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मालेगावी आढळून आले आहेत. यामुळे राज्य शासनाने या शहराकडे विशेष लक्ष पुरविले आहे. शुक्रवारी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. रात्री उशिरा नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोर्जे यांनी शहरातील बंदोबस्ताचा व प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेत कडेकोड बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मनपा, महसूल, पोलीस प्रशासनाकडून शहरात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील नागरिकांना भाजीपाला कमी पडू नये म्हणून शनिवारी शहरालगतच्या दाभाडी-सटाणा रस्त्यावरील राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भाजीपाल्याचा लिलाव झाला. आडतदारांना विशेष पास देण्यात आले होते. शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी आणला होता. या ठिकाणांहून शहरासह नाशिक, मुंबई इतर ठिकाणी भाजीपाला रवाना करण्यात आला आहे.शुक्रवारी एकाच दिवशी १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच पोलीस यंत्रणेने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. बॅरिकेडिंग लावून रस्ते अडविण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातून नागरिक घराबाहेर पडणार नाही यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.दरम्यान,महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई केल्याच्या निषेधार्थ स्वच्छता कर्मचाºयांनी शनिवारी कामावरच येणे टाळल्याने स्वच्छतेचा निर्माण झाला आहे. शनिवारी सकाळी हजेरी सेंटरवर सफाई कामगार आलेला नव्हता. या संदर्भात सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रभारी स्वच्छता निरीक्षक उमेश सोनवणे यांनी नाकाबंदी केलेल्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या पोलीसांकडून कारवाई होत असल्याने कामावर कोणी येण्यास तयार नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक