वणी : परराज्यात कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. परंतु उत्पादकांची अपेक्षा व भाववाढीचा समन्वय साधणे आव्हानात्मक असल्याचा सूर उमटतो आहे. वणीच्या उपबाजारात आज १७५ वाहनांमधून सुमारे चार हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ९०० रुपये, किमान ५००, तर सरासरी ७५० रु पये क्विंटल भावाने कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पडले. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब या राज्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा विक्रीसाठी पाठविण्यात येत असून, दर्जेदार कांद्याला परदेशात मागणी आहे. मात्र उत्पादकांकडे प्रमाण कमी असल्याने व भाव सुधारण्याचे संकेत असले तरी बेमोसमी पावसाच्या वातावरणामुळे कांदा साठवणुकीचा धोका कोणी पत्करायला तयार नाही. यामुळे भावात चढ-उताराची स्थिती राहणार असल्याची माहिती निर्यातदार नंदलाल चोपडा यांनी दिली. (वार्ताहर)
कांद्याच्या भावात वाढ
By admin | Updated: October 8, 2016 00:32 IST