शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:22 IST

येवला : राजस्थान व मध्य प्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड असल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. कांदा हजारावर गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ठळक मुद्देयेवला : उत्पादकांच्या आशा पल्लवित

येवला : राजस्थान व मध्य प्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड असल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. कांदा हजारावर गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कांदा भावात दररोज सुधारणा होत आहे. शेतकरी चाळीत साठवून ठेवलेला कांदा पाहून आनंदी होत असून, उन्हाळ कांदा तारणार असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी उन्हाळ कांद्याला भाव मिळाला होता, त्याची पुनरावृत्ती होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या सप्ताहात शुक्रवारी कांद्यास सरासरी १०५१ रुपये भाव मिळाला. सोमवारी तुलनेत १०० रुपयांनी वाढ होऊन, सरासरी ११५० रुपये प्रतिक्विंटल, तर कमाल १२५२ रुपयांपर्यंत पोहचल्याने बळीराजाची कळी फुलणार असल्याचा आशावाद निर्माण झाला आहे. यापुढे काही दिवस तरी कांदा भाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे जाणकार सांगत आहेत. गेल्या दहा ते बारादिवसांपासून कांदा भावात अल्पशी वाढ झाली आहे. गेल्या सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल आदी राज्यात व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापूर आदी ठिकाणी मागणी चांगली होती. दररोज ५० ते १०० रुपयांची वाढ होत असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.