शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

By admin | Updated: February 18, 2015 01:32 IST

जिल्ह्यात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्यांची संख्या मंगळवारी सहावर पोहोचली आहे़ या संशयित रुग्णांच्या घशातील स्त्राव पुणे येथे पाठवावा लागतो; मात्र हे स्त्राव घेण्याचे काम डॉक्टरांऐवजी नर्सच करीत असल्याचे चित्र आहे़ त्यांना हे स्त्राव घेण्याचे काम सुव्यवस्थितपणे करता येत नसल्याने पुणे प्रयोगशाळेकडून नव्याने स्त्राव पाठविण्यास सांगितले जात असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात एकच कक्ष कार्यान्वित असल्याने नव्याने येणाऱ्या रुग्णांना ठेवायचे कुठे? असा प्रश्नही निर्माण झाला आहे़नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात द्वारकाबाई कहानू जुगरे (६०, शहापूर, ठाणे), प्रीती ओमप्रकाश श्रीवास्तव (३८, इगतपुरी), रेहान हाश्मी (३७, वडाळागाव, मेहबूबनगर), मोहिनी नितीन राकेश (२५, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी), लक्ष्मी खंडू शार्दुल (६२, उमराळे, दिंडोरी), शाहीद सिकंदर शेख (१८, सिन्नर) हे रुग्ण गुरुवार (दि़१२) पासून उपचार घेत आहेत़ जिल्ह्यात या रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तसेच पाच लोकांचा बळी गेला असताना जिल्हा रुग्णालयात केवळ एकच कक्ष सुरू करण्यात आला आहे़ या कक्षामध्ये फक्त सहाच रुग्ण ठेवता येतात़ स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचा घशातील स्वॅब घेऊन तो पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो़ तेथील तपासणीनंतर संबंधित रुग्णाला स्वाइन फ्लू झाला आहे की नाही याबाबत अहवाल येतो़ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांचा स्वॅब घेणे आवश्यक असताना हे काम नर्सेसकडून करून घेतले जाते़ नर्सेसकडून तो व्यवस्थितरीत्या घेतला जात नसल्याने पुणे येथून पुन्हा नमुने पाठविण्याबाबतही सांगण्यात आले आहे़ स्वाइन फ्लूने मृत्यू पावलेल्या महिलेचा स्वॅबही मागविण्यात आला होता़ मात्र, महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तो कसा पाठविणार हे प्रश्नचिन्हच आहे़ या महिलेच्या नातेवाइकांचेही नमुने पुणे येथे पाठविण्यात आले; मात्र तेही पुन्हा नव्याने पाठविण्याबाबत सांगण्यात आले आहे़ जिल्हा रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनीच रुग्णांचे स्वॅब घ्यावेत, अशी जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़एकनाथ माले यांनी निश्चित करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)