शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी मतदारांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: August 12, 2014 02:03 IST

मालेगावी मतदारांच्या संख्येत वाढ

 मालेगाव : लोकसभा निवडणुकीनंतर मतदार नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असली मतदारांचा नाव नोंदणीसाठी उत्साह नसल्याने फेरमतदान नोंदणीत केवळ तीन टक्के मतदारांची वाढ झाली आहे.मतदार यादीतून नावे गायब होणे, मतदानापासून वंचित राहणे आदि अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पूर्ण मतदान नोंदणी मोहीम राबवण्यात येत आहे. गेल्या मे महिन्यापासून सुरू असलेल्या मोहिमेस मतदारांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा क्षेत्रामध्ये सुमारे तीन टक्के मतदार वाढले. त्यामुळे मतदान नोंदणी कार्यक्रम केवळ एक ‘फार्स’ ठरत आहे.मालेगावी दोन्ही मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ झाला असल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यावेळेस सुधारित याद्यांमध्ये नाव नसणे, नावे अन्य मतदान केंद्रांवर असणे असे आरोप खुद्द लोकप्रतिनिधी व मतदारांनी केले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगातर्फे जानेवारी २०१४ पासून विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला.त्यानुसार जून महिन्यात तालुक्यातील मध्य व बाह्य मतदारसंघातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या याद्यांबाबत हरकत व नवीन नाव नोंदणीसाठी सांगण्यात आले. मतदार निरंतर नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली. त्यानुसार मतदार व लोकप्रतिनिधी, विविध पक्षांच्या प्रमुखांना सूचना करण्यात आल्या. मालेगाव तहसील कार्यालयात सध्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची लगीनघाई सुरू आहे.मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्रात पूर्वी २,३५,५८६ इतके मतदार होते. त्यात केवळ ३.१५ टक्के इतकी वाढ झाली तर मालेगाव बाह्य विधानसभा क्षेत्रात पूर्वी २,८८,४१२ इतके मतदार होते. त्यात सुमारे ३.३१ टक्के इतकी वाढ झाली. मतदार यादीत नावे नोंदणीसाठी प्रशासनातर्फे काही शाळांमध्ये जनजागृती व पथनाट्य अभियानसुद्धा राबवण्यात येत असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी गिरीश वाखारे यांनी सांगितले तरीसुद्धा मोहिमेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असे एकंदरीत आकडेवारीवरून दिसून येत आहे.