शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२0१५ मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: January 1, 2016 00:06 IST

सातपूर पोलीस ठाणे : चोऱ्या-घरफोडीच्या घटना अधिक

गोकुळ सोनवणे सातपूरमागील वर्षापेक्षा यावर्षी चोऱ्यामाऱ्या आणि घरफोड्यांच्या सर्वाधिक घटनांबरोबरच हाणामारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. तर वाहनचोरी, विनयभंग, मोटार अपघात, खून आणि खुनाचा प्रकार हे गुन्हेदेखील घडले असून, दोनशेपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहेत.सातपूर पोलीस ठाणे हद्दीत सातपूर औद्योगिक वसाहतीबरोबर प्रबुद्धनगर, स्वारबाबानगर, संतोषीमातानगर, कांबळेवाडी, भीमनगर आदि झोपडपट्टींचा समावेश आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. तर चोऱ्यांबरोबरच घरफोडीच्या घटनादेखील घडत आहेत. चोऱ्या आणि घरफोड्या रोखण्यात पोलिसांना सपशेल अपयश आल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. चोऱ्या आणि घरफोड्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.त्याचप्रमाणे खुनाच्या तीन घटना आणि खुनाचा प्रयत्नदेखील घडला आहे. दंग्याच्याही घटनांची नोंद आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची घटनाही घडली आहे. मोटर अपघातांची नोंद मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचप्रमाणे प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये वर्षभरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.गुन्ह्यांच्या प्रमाणात घट व्हावी, सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यातील दरी दूर व्हावी, यासाठी सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर परिसरात नागरिक- पोलीस संवाद, पोलीस अधिकाऱ्यांची सायकल पेट्रोलिंग, चौक सभा आदि सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी गुन्ह्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही.