शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोंडवाड्यांची संख्या वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:15 IST

शहरात मोकाट जनावरांची वाढती संख्या ही वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच नागरिकांनाही उपद्रवी ठरत आहे. महापालिकेचे दोन कोंडवाडे त्यासाठी अपुरे ठरत आहेत. शहराचा विस्तार पाहता कोंडवाड्यांची संख्या वाढविण्याचे आदेश महापालिका स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला दिले. दरम्यान, मोकाट जनावरांच्या ठेक्याबाबत दर आठवड्याला होणाºया कार्यवाहीचा अहवालही स्थायीला सादर करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या.

नाशिक : शहरात मोकाट जनावरांची वाढती संख्या ही वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच नागरिकांनाही उपद्रवी ठरत आहे. महापालिकेचे दोन कोंडवाडे त्यासाठी अपुरे ठरत आहेत. शहराचा विस्तार पाहता कोंडवाड्यांची संख्या वाढविण्याचे आदेश महापालिका स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला दिले. दरम्यान, मोकाट जनावरांच्या ठेक्याबाबत दर आठवड्याला होणाºया कार्यवाहीचा अहवालही स्थायीला सादर करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करत शनिवार, दि. २३ सप्टेंबरच्या अंकात ‘विनादरवाजांचे कोंडवाडे’ या मथळ्याखाली शहरातील कोंडवाड्यांच्या सद्यस्थितीकडे लक्ष वेधले होते. त्याचीच गंभीर दखल घेत सोमवारी (दि.२५) झालेल्या महापालिका स्थायी समितीच्या सभेत भाजपाचे सदस्य जगदीश पाटील आणि मुकेश शहाणे यांनी प्रशासनाला जाब विचारला. मुकेश शहाणे यांनी सांगितले, सातपूर येथील कोंडवाडा मद्यपींचा अड्डा बनला आहे. ज्याजनावरांचे मालक आले नाहीत, ती जनावरे  कोठे जातात, असा सवाल करत त्याच्या संशयास्पद व्यवहाराबद्दल जाब विचारला तर भाजपाचेच जगदीश पाटील यांनी मोकाट जनावरांचा ठेका हा पशुवैद्यकीय विभागाकडे अपेक्षित असताना तो अतिक्रमण विभागाकडे कसा दिला जातो, असा प्रश्न उपस्थित केला. शहरात केवळ दोनच ठिकाणी कोंडवाडे आहेत. त्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे सहा विभागात सहा कोंडवाडे असणे जरुरीचे आहे.  गोशाळेत पाठविण्यात येणाºया जनावरांच्या नोंदी ठेवल्या जातात काय, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. मोकाट जनावरे पकडण्याच्या ठेकेदाराकडून होणाºया कार्यवाहीचा अहवाल दर आठवड्याला स्थायीच्या सभेत ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.ठेक्याचे काम पशुवैद्यकीय विभागाचेच!अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी यावेळी खुलासा करताना सांगितले, १ एप्रिल २०१६ पासून अ‍ॅनिमल वेल्फेअर या संस्थेला ठेका देण्यात आला आहे. सातपूर येथे बांधकाम विभागाने कोंडवाडा बांधलेला आहे, तर पंचवटीत जुनाच कोंडवाडा आहे. जुन्या नाशकात पूर्वी कोंडवाडा होता, परंतु त्याठिकाणी विकासकाम साकारण्यात आले आहे. आतापर्यंत ५४२ जनावरे पकडण्यात आली असून, ४५७ जनावरे मालकांनी परत नेली आहेत. त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार ३५९ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत ५७ जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. वैद्यकीय तपासणी करूनच सदर जनावरे गोशाळेत पाठविली जातात. महापालिकेत आता पशुवैद्यकीय अधिकाºयाची नियुक्ती झालेली असल्याने त्या विभागाकडेच मोकाट जनावरे पकडण्याची जबाबदारी असली पाहिजे, अशी भूमिकाही बहिरम यांनी स्पष्ट केली.