शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

दातली-खोपडीदरम्यान भूजल पातळीत वाढ

By admin | Updated: September 2, 2014 01:12 IST

दातली-खोपडीदरम्यान भूजल पातळीत वाढ

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील खोपडी ग्रामपंचायतीच्या वतीने देवनदीवरील ब्रिटिशकालीन पूरचारीची स्वच्छता केल्याने या शिवारात पाणी आले असून, त्यामुळे दातली ते खोपडीदरम्यानच्या शिवारातील भूजलपातळीत वाढ झाल्याची माहिती खोपडीच्या सरपंच अंकिता भास्कर गुरुळे यांनी दिली.तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील देवनदीच्या उगम क्षेत्रात मध्यंतरी झालेल्या संततधारेमुळे कोनांबे धरण ओसंडून वाहू लागल्याने देवनदीला पाणी आले आहे. या नदीवर ब्रिटिशकालीन बंधारे बांधण्यात आले असून, त्यावरून पूरचाऱ्या काढण्यात आलेल्या आहेत. सदर गावपाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. त्यात काटेरी झुडपे, खुरट्या वनस्पतींनी वेढला होता तर अनेक ठिकाणी तो बुजला होता. मात्र, हा गावपाट दुरुस्त करून प्रवाहित केल्यास पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो, या विचारातून गुरुळे यांनी ग्रामनिधीतून दातलीपासून ते खोपडी बुद्रुक येथील पाझरतलावापर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे यंदा देवनदीला पाणी येताच या पूर कालव्याला पाणी वळवून कालवा प्रवाहित करण्यात आला. त्यामुळे शहापूर, खोपडी शिवारात कालव्याचे पाणी फिरल्यामुळे दोन्ही गावांच्या शिवारातील विहिरींच्या, तसेच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नाही. यंदाही पूर्वभागात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस झाला नसल्याने बंधारे, पाझरतलाव, नालाबंडिंग, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. अन्य गावांमध्ये अद्यापही पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. यंदा पावसाळ्याचे तब्बल दोन महिने उलटून गेले आहेत; परंतु पूर्व भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. यंदा उशिरा का होईना पश्चिम पट्ट्यातील देवनदीच्या उगमस्थानावर चांगला पाऊस झाल्याने देवनदीला पाणी आले आहे. या नदीवर ब्रिटिशकालीन ३२ बंधारे आहेत. त्यावरून पूरपाण्यासाठी कालवे काढण्यात आले असून, देवनदीला पूरपाणी आल्यावर त्या कालव्यातून शिवारात पाणी सोडण्यात येते. यंदा कुंदेवाडी जवळील बंधारा भरल्याने त्यावरील पूरचारी प्रवाहित झाली आहे. तसेच खोपडी ग्रामपंचायतीने दुरुस्ती केल्याने दातलीजवळील बंधाऱ्यातून खोपडीला पाणी सुरू झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांना त्याचा लाभ होणार आहे. (वार्ताहर)