शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढ करा, दारूचे दर कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:47 IST

नाशिक : पेट्रोल, डिझेल पाठोपाठ घरगुती वापराचे गॅस सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारकडून सातत्याने वाढ केली जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी ...

नाशिक : पेट्रोल, डिझेल पाठोपाठ घरगुती वापराचे गॅस सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारकडून सातत्याने वाढ केली जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी डाव्या आघाडीच्यावतीने अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर उपरोधिक आंदोलन करून पेट्रोलचे दर शंभर रूपये करा परंतु दारूचे दर मात्र कमी करा अशी मागणी करण्यात आली.शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरच मद्य विक्रीचेही दुकान असल्यामुळे डाव्या आघाडीने आंदोलनासाठी ठिकाण निश्चित केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात माकप, शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले.             त्यात म्हटले आहे की, पेट्रोल शंभर रूपयांपर्यंत पोहोचले असून, अबकारी कर कमी करून त्यावर कृषी अधिकार कराची आकारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकार जनतेला दिलासा देण्याऐवजी दिशाभूल करीत आहे. वीज बिलाबाबतही हाच प्रकार सुरू असून, भाजप या प्रश्नावर खोटे आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने वीज बिल कायदा आणून सर्व सामान्यांना १०० युनिट पर्यंतची सवलत रद्द करण्याच्या तरतुदी करीत आहे. वीज व्यवसायाचे खासगीकरण करून अदाणी-अंबानीच्या ताब्यात देण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.

महागाई विरोधात सत्ताधाऱ्यांनी खोटे आंदोेलन करणे बंद करून पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करावी अशी मागणी करतानांच सत्ताधाऱ्यांचे या संदर्भातील एकूणच वागणे पाहता, पेट्रोल-डिझेलची दरवाढ शंभर रूपये करा, घरगुती गॅस सिलिंडर एक हजार रुपये करा व दारूचे दर कमी करण्याची वेळ सरकारने आणल्याचेही म्हटले आहे. या आंदोलनात डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, तानाजी जायभावे, दत्तु तुपे, समीर शिंदे, निवृत्ती कसबे, नाजिम काझी, सीताराम ठोंबरे, मनिष बस्ते आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप