शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

व्हर्च्युअल करन्सी संशयितांच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: May 26, 2017 00:28 IST

आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने नोंदणी फॉर्म भरून घेणाऱ्या पाच संशयितांच्या पोलीस कोठडीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस़ एम़ बुक्के यांनी एक दिवसाने वाढ केली़

 लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरातील नामांकित हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित करून त्यामध्ये बिट क्वाइन या बेकायदेशीर व्हर्च्युअल करन्सीच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या कमिशनचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने नोंदणी फॉर्म भरून घेणाऱ्या विदेशी नागरिकासह पाच संशयितांच्या पोलीस कोठडीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस़ एम़ बुक्के यांनी बुधवारी (दि़ २४) एक दिवसाने वाढ केली़ तर टूरिस्ट व्हिसावर येऊन बिट क्वाईनची मार्केटिंग करणारे रोमजी बिन अहमद या संशयिताविरोधात पोलिसांनी फॉरेनर्स अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल केला आहे़भारतात कायदेशीर चलन म्हणून अधिकृत मान्यता नसलेली बिट क्वाइन या व्हर्च्युअल करन्सीची खरेदी-विक्री केल्यास भविष्यात मोठ्या रकमेच्या परताव्याचे कमिशन व फायदे यांचे आमिष दाखवून नाशिक शहरातील नामांकित हॉटेल्समध्ये जानेवारी २०१७ पासून नागरिकांसाठी सेमिनार घेण्यात आले़ तसेच मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांना बिट क्वाइन खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणे, सभासद नोंदणी फॉर्म भरून घेणे, स्टिकर्स, माहिती पत्रक, बोनस फॉर्म, लोगो तयार करून तो खरा आहे असे भासवून नागरिकांची फसवणूक केल्याची फिर्यादी सायबर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे़याप्रकरणी सायबर पोलिसांनी संशयित निशेद महादेव वासनिक (१९, रा़ वसिक प्राइड सोसायटी, आराधनानगर, दिघोरी-खर्बी रोड, नागपूर), रोमजी बिन अहमद (४७, रा़ जलान ईदाह-२, तमन सेताजी ईदाह, सुनगाई पेतानी, केदाह, मलेशिया), आशिष शंकर शहारे (रा़ गोरावती रेसिडेन्सी, कोपरगाव, जि़ अहमदनगर), दिलीप प्रेमदास बनसोड (२९, रा़ फाळके प्राईड अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक) कुलदीप लखू देसले (३८, रा़ सुरेश बापू प्लाझा, खुटवडनगर, नाशिक) तसेच फ्यूचर बिटकॉम व त्यांच्या इतर सहकारी कंपनी व संचालक यांच्यावर चिट्स अ‍ॅण्ड मनी सर्क्युलेशन स्किम्स (बॅनिंग) अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़