शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:24 IST

सिन्नर : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या १५ ...

सिन्नर : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या १५ दिवसात शहर व तालुक्यात ५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सिन्नर ग्रामीण रुग्णालय आणि इंडिया बुल्स कोविड सेंटर या दोन ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, गेल्या महिन्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने इंडिया बुल्स कोविड सेंटरला रुग्ण नव्हते. केवळ शहरातील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र, गेल्या १५ दिवसात ५९ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर गेल्या दोन दिवसात १४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात ३९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सिन्नर शहर व तालुक्यात आत्तापर्यंत ३ हजार ९९५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील ३ हजार ८३८ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर कोरोनामुळे सिन्नर तालुक्यात आत्तापर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाला असून, ५५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क किंवा रुमालाचा वापर करण्यासह वेळोवेळी हात धुण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

इन्फो

आजपासून स्वॅब घेणार

गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढल्याने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात स्वॅब देण्यासाठी नागरिक येत आहेत. त्यामुळे आता गुरुवार (दि. १८)पासून इंडिया बुल्स येथील कोविड रुग्णालयात नवीन संशयित रुग्णांचे स्वॅब संकलन केले जाणार असल्याची माहिती डॉ. लहू पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.