शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

लासलगाव-पुणे बस बंद झाल्याने गैरसोय

By admin | Updated: September 6, 2016 22:55 IST

लासलगाव-पुणे बस बंद झाल्याने गैरसोय

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी मार्गे जाणारी लासलगाव-पुणे बस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून सदर बस पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. लासलगाव आगाराने एक एप्रिलपासून लासलगाव, विंचूर, खेडलेझुंगे, सोमठाणे, पंचाळे, पांगरी, मऱ्हळ, नांदूरशिंगोटे, संगमनेर मार्गे पुणे अशी बसफेरी सुरू केली होती. या मार्गावरून धावणारी ही एकमेव बस असल्याने प्रारंभीपासूनच या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. लासलगाव व संगमनेर या दोन मोठ्या बाजारपेठा या मार्गात येत असल्याने दोन्ही गावांतील प्रवाशांना या बसचा लाभ होत होता. मधल्या मार्गाने संगमनेर व पुणे येथे कमी खर्चात जाणारी ही बस असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते. तथापि, दोन आॅगस्टला खेडलेझुंगे येथील रस्त्याचा भरावा पुरात वाहून गेल्याने ही बस बंद करण्यात आली होती. बस बंद होऊन महिना उलटला आहे. अद्यापही सदर बस पुन्हा सुरू होत नसल्याने नाईलाजाने लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.बसचा फेरा बंद असल्याने खेडलेझुंगे, सोमठाणे, पंचाळे, पांगरी, मऱ्हळ भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर बस पुन्हा सुरू करण्याची मागणी उत्तम पगार, सोमनाथ पगार, युनुस कादरी, रवि पगार, संजय वारुळे, शांताराम पगार, बंडू पगार, विष्णू कलकत्ते आदिंसह प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)