शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण पेयजल योजना : टँकरद्वारे गावाला पुरविले पाणीतीन गावे अद्यापही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:30 IST

अपूर्ण पेयजल योजनेमुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी महिलांची उडालेली झुंबड.सायखेडा : निफाड तालुक्यातील भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर येथील अपूर्ण राष्ट्रीय पेयजल योजनेचा फटका नागरिकांना बसला आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. योजना अपूर्ण असूनदेखील पंचायत समितीस्तरावर ठेकेदाराने रक्कम काढून घेतल्याने अपूर्ण कामांमुळे तीन गावांवर पाणीटंचाईची वेळ आली ...

ठळक मुद्देअपूर्ण पेयजल योजनेमुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केबल जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद

अपूर्ण पेयजल योजनेमुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी महिलांची उडालेली झुंबड.

सायखेडा : निफाड तालुक्यातील भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर येथील अपूर्ण राष्ट्रीय पेयजल योजनेचा फटका नागरिकांना बसला आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. योजना अपूर्ण असूनदेखील पंचायत समितीस्तरावर ठेकेदाराने रक्कम काढून घेतल्याने अपूर्ण कामांमुळे तीन गावांवर पाणीटंचाईची वेळ आली आहे. नागरिकांच्या मदतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असला तरी भविष्याचे काय, असा प्रश्न भेडसावत आहे.१ कोटी २७ लाख रु पये खर्च करून तीन गावांची संयुक्त राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली. अनेक दिवसांपासून करंजगाव येथून नवीन पाईपलाईन टाकणे, पाण्याची टाकी बांधणे, गावात मुख्य पाईपलाईन फिरवणे अशी कामे चालू होती. मात्र कामांच्या इंस्टीमेन्टमध्ये पाण्याच्या टाकीला संरक्षण जाळी बसवणे, केबल, मोटार बदलणे, ठिकठिकाणी व्हॉल बसवणे , टाकीच्या जिन्याला रिलिंग करणे हे कामे अपूर्ण असल्याने योजना ग्रामपंचायतींने ताब्यात घेतली नाही. कामे पूर्ण झाल्याशिवाय योजना ताब्यात घेऊ नये असा ठराव ग्रामसभेत केला. ठरावाची नक्कल व ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेला अर्ज ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी पंचायत समीतीच्या संबंधित अधिकारी आणि विभागाला दिला होता. तरी देखील काम पूर्णत्वाची शहानिशा न करता ठेकेदाराने पैसे काढून घेतले. त्यामुळे अपूर्ण योजना ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांना न विचारता पैसे दिल्याने आठ दिवसापासून केबल जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. ग्रामसभेचा ठराव व ग्रामस्थांच्या पत्राला या निमित्त केराची टोपली दाखविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण झाल्याशिवाय योजना ताब्यात घेऊ नये असा ठराव ग्रामसभेत केला. ठरावाची नक्कल, ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेला अर्ज पंचायत समितीच्या संबंधित अधिकारी आणि विभागाला दिला होता. तरीदेखील काम पूर्णत्वाची कोणतीही शहानिशा न करता समितीस्तरावर ठेकेदार यांनी पैसे काढून घेतले. आठ दिवसांपासून केबल जळाली आहे. त्यामुळे गावांना पाणीपुरवठा बंद आहे.- शरद खालकर, ग्रामपंचायत सदस्य