शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा बॅकफूटवर : मुंढेंचा दरवाढीचा प्रस्ताव गुंडाळला मिळकत करवाढ अखेर १८ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:02 IST

नाशिक : युक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेकडे मिळकत करात प्रस्तावित केलेली ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंतची दरवाढ अखेर सत्ताधारी भाजपाने गुंडाळून ठेवली आहे.

ठळक मुद्देकंबरतोड करणाºया करवाढीस विरोधप्रस्तावात सुधारणा करत त्यात जबर वाढ

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेकडे मिळकत करात प्रस्तावित केलेली ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंतची दरवाढ अखेर सत्ताधारी भाजपाने गुंडाळून ठेवली असून, दरवाढ जवळपास निम्म्यावर आणत १८ टक्क्यांवर शिक्कामोर्तब केले आहे. नाशिककरांची कंबरतोड करणाºया या करवाढीस विरोधी पक्षांसह व्यापारी-उद्योजकांनी विरोध प्रकट केल्यानंतर सत्ताधारी भाजपाला बॅकफूटवर येणे भाग पडले आहे. महासभेत करवाढीचा प्रस्ताव मंजूर केला असला तरी महापौरांनी मात्र नगरसचिव विभागाकडे निवासी ते औद्योगिक मिळकतींसाठी सरसकट १८ टक्क्यांपर्यंत दरवाढीचा ठराव स्वाक्षरी करून पाठविला आहे. महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या काळात स्थायी समितीवर पाठविलेल्या मिळकत करवाढीच्या प्रस्तावात सुधारणा करत त्यात जबर वाढ केली होती. निवासी करात ३३ टक्के, अनिवासी करात ६४, तर औद्योगिक करात तब्बल ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ सुचविण्यात आलेली होती. शिवाय, भांडवली मूल्यावर आधारित करवाढीचा आग्रह धरण्यात आला होता. गेल्या २० फेबु्रवारीला झालेल्या महासभेत सदरचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला त्यावेळी, विरोधी पक्षांनी या दरवाढीस तीव्र विरोध दर्शवत सभात्याग केला होता. सर्वसाधारण कर २५ ते ३१ टक्क्यांवरून ३० ते ३६ टक्के करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण स्वच्छता कर ३ वरून ६ टक्के, जललाभ कर २ वरून ४ टक्के, मलनिस्सारण लाभकर ५ वरून १० टक्के, पथकर ३ वरून ५ टक्के तर मनपा शिक्षण कर २ वरून ३ टक्के याप्रमाणे एकूण १८ टक्के करवाढ असणार आहे. सरकारी शिक्षण कर, रोजगार हमी कर निवासी कर हे राज्य शासनाच्या कायद्यातील तरतुदीनुसार लागू राहतील. आगनिवारण कर व वृक्षसंवर्धन करात बदल केलेला नाही. या दरवाढीमुळे महापालिकेला वार्षिक १२ कोटी ६० लाख रुपये इतके उत्पन्न अपेक्षित आहे.