शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतीवरील समझोता; एक कोटीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:53 IST

नाशिक : कायदेशीर हक्क नसताना बेकायदेशीरपणे औरंगाबाद वक्फ मंडळाकडे मिळकतीत हक्क असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून समझोत्यापोटी एक कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या नऊ संशयितांविरोधात भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

ठळक मुद्देसंस्थेची नोंदणी करण्याकरिता खोटा अर्ज दाखल केलाधमकावल्याचे फिर्यादित म्हटले आहे

नाशिक : कायदेशीर हक्क नसताना बेकायदेशीरपणे औरंगाबाद वक्फ मंडळाकडे मिळकतीत हक्क असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून समझोत्यापोटी एक कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या नऊ संशयितांविरोधात भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़जकी अहमद गुलाम हुसेन खतीब (४९,रा़ जियाउद्दीन मिल कम्पाउंड, चौक मंडई) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची व त्यांच्या नातेवाइकांच्या मालकीची सिटी सर्व्हे नंबर ३८२३ अ मध्ये प्रत्यक्षात कब्जात असलेली ६ हजार ४०० चौरस मीटर क्षेत्र आहे़ यापैकी ३००० चौरस मीटर क्षेत्रावर संशयित सय्यद लियाकत निसार, सय्यद फिरोज सादीक, सय्यद इरफान बाबू, सय्यद बाबू अब्बास, शेख मोबीन युसूफ, सय्यद मुदस्सर सलीम, मिर्झा एजाज जावेद बेग, शेख शादाब अकबर, सय्यद अझहर नझीर (रा़ चौक मंडई, भद्रकाली) यांनी कोणताही कायदेशीर हक्क नसताना बेकायदेशीररीत्या सय्यद हबीब शहा फकिर वक्फ अलल औलाद, नाशिक या वक्फ संस्थेची नोंदणी करण्याकरिता खोटे वक्फ डीड प्रतिज्ञा पत्रासह महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद येथे सादरकेले़ तसेच सदर वक्फ संस्थेची नोंदणी झालेली नसताना नगर भूमापन अधिकारी क्रमांक एक सिटी सर्व्हे यांच्याकडे या मिळकतीवर वक्फ संस्थेची नोंदणी करण्याकरिता खोटा अर्ज दाखल केला़ संशयितांनी जकी खतीब व त्यांच्या नातेवाइकांचे मिळकतीच्या कब्जाचे नुकसान व्हावे वा फिर्यादींनी मिळकतीवर कब्जा सोडून द्यावा अन्यथा समझोत्याकरिता एक कोटी रुपये द्यावेत यासाठी धमकावल्याचे फिर्यादित म्हटले आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नऊ संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़