शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:13 IST

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना दिशा देणारे विज्ञान प्रदर्शन एक व्यासपीठ असून, विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा व आपल्यासह देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलावा. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कल्पनाशक्ती अशा प्रदर्शनातून विकसित होते, असे प्रतिपादन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केले.

येवला : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना दिशा देणारे विज्ञान प्रदर्शन एक व्यासपीठ असून, विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा व आपल्यासह देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलावा. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कल्पनाशक्ती अशा प्रदर्शनातून विकसित होते, असे प्रतिपादन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केले.येवला तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग, कंचनसुधा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज धानोरे आणि विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४५ वे विज्ञान प्रदर्शनाचे कंचनसुधा इंटरनॅशनल स्कूल येथे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार दराडे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कंचनसुधा ट्रस्टचे अध्यक्ष अजय जैन, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र परदेशी, पंचायत समितीच्या सभापती कविता आठशेरे, रवींद्र जैन, अक्षय जैन, डॉ. स्वप्नील शहा, प्राचार्य दत्ता महाले, संतोष विंचू, प्राचार्य माणिक मढवई, डॉ. दर्शना जैन, राणी भंडारी, पी. डी. गायकवाड, रमेश गायकवाड, सुनील मारवाडी, रामदास भवर, माणिकराव मढवई, रामदास भड, बाजीराव सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.अदिती पटेल, प्रियंका पटेल आणि समूहाने स्वागत गीत सादर केले. गटशिक्षण अधिकारी मनोहर वाघमारे यांनी प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. अतिथी परिचय सुनील मेहत्रे यांनी करून दिला. यावेळी प्रवीण गायकवाड, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनात प्राथमिक विभागात ९१, माध्यमिक विभागात ६८, शिक्षक शैक्षणिक साहित्य गटाच्या प्राथमिक विभागातून ११, माध्यमिक विभागातून ४ तर प्रयोगशाळा परिचर गटातून ४ उपकरणे मांडण्यात आली आहेत.प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दिवसभर रांगा लागल्या. किरण नागरे, नीलेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. विस्तार अधिकारी वंदना चव्हाण यांनी आभार मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रscienceविज्ञान