शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या हॉलचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:46 IST

सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती निवासी केंद्राच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या हॉलचे उद्घाटन शाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देसंस्था व देणगीतून जमा झालेल्या रकमेतून ८० बाय ४० च्या प्रशस्त हॉलचे बांधकाम

 

 

सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती निवासी केंद्राच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या हॉलचे उद्घाटन शाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या हस्ते झाले.माळेगावचे उद्योजक त्रिलोकनाथ अग्रवाल, डॉ. किरण बडगुजर, शिवनाथ कापडी आदींसह मान्यवर उपस्थित होते. मेंढी येथे नाशिकच्या डॉ. आनंद पाटील फाउण्डेशनच्या वतीने चार वर्षांपासून सहारा निवासी व्यसनमुक्ती केंद्र सुरू आहे. आतापर्यंत दीड हजार रुग्णांनी समुपदेशन, औषधोपचार, वैचारिक प्रबोधन या माध्यमातून व्यसनमुक्त होऊन त्यांनी सुखी संसाराची वाट धरली आहे. एक ते तीन महिने या केंद्रात वास्तव्य केले जाते. या केंद्रास कुठलेही शासकीय अनुदान मिळत नसून केवळ रुग्णांकडून मिळणारी अल्प फी व दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या देणगीतून या केंद्राचा खर्च भागविला जात आहे. संस्था व देणगीतून जमा झालेल्या रकमेतून ८० बाय ४० च्या प्रशस्त हॉलचे बांधकाम पाच लाख रु पये खर्च करून करण्यात आले आहे.यावेळी महेश मोरे, सपना बडगुजर, उत्तम गाढे, सुभाष गिते, भाऊसाहेब रणदिवे, सचिन ओझा, अ‍ॅड. भाग्यश्री ओझा, प्रेरणा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर बेलोटे, फिलोमिना डिक्रूज, पी.टी. डिसूझा, जैनेट रिबोला, रूंजाजी गिते, दीपक गिते, शीला गिते, सुरेश देव्हारे, प्रवीण शिंदे, योगेश धात्रक, नितीन साळुंखे, वनिता गिते, गौरव तनपुरे, बाळकृष्ण तनपुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यानिमित्ताने तनपुरे महाराजांचा गावांमध्ये पोवाड्याचा कार्यक्र म पार पडला.रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भावी काळात हॉलचा उपयोग होणार असल्याची माहिती केंद्राध्यक्ष मधुकर गिते यांनी दिली. यावेळी डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून फीत कापून व श्रीफळ वाढवून हॉलचे उद्घाटन करण्यात आले.