शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब देवमामलेदारचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST

येथील संत श्री यशवंतराव महाराज मंदिराच्या संत सखाराम महाराज सभागृहात रोटरी क्लब ऑफ देवमामलेदारच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ...

येथील संत श्री यशवंतराव महाराज मंदिराच्या संत सखाराम महाराज सभागृहात रोटरी क्लब ऑफ देवमामलेदारच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, तर रोटरीचे सहप्रांतपाल बी.के. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी रोटरीने पुढाकार घेणे गरजेचे असून, क्लबने येत्या वर्षात आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यावरण या क्षेत्रात चांगले काम उभारण्याचे आवाहनही शिंदे यांनी केले. यावेळी नूतन अध्यक्ष सुनील खैरणार यांनी मावळते अध्यक्ष प्रीतम ततार यांच्याकडून, तर नूतन सचिव संजय देसले यांनी मावळते सचिव खैरणार यांच्याकडून कॉलर, पीन व सनद घेऊन पदभार स्वीकारला. राजेंद्र भांगडिया यांची देवमामलेदार देवस्थानच्या खजिनदारपदी तसेच ॲड. सोमदत्त मुंजवाडकर यांची साहित्ययानच्या सचिवपदी, तर काशीनाथ डोईफोडे यांची सदस्यपदी निवड झाल्याने रोटरीतर्फे त्यांचा सत्कार झाला. कोरोनायोद्धा म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत कापडणीस, डॉ. महेंद्र कोठावदे, मोफत जेवणाचे डबे पुरविणारे संजय जाधव यांच्यासह सटाणा ग्रामीण रुग्णालय, पालिकेचा आरोग्य विभाग, पोस्ट ऑफिस येथील कर्मचाऱ्यांनाही सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. नूतन सचिव संजय देसले यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी रेखा माळी, किशोरबाबा सोनवणे, चंद्रकांत खैरनार, पांडुरंग पाटील, भास्कर जगताप, देवीदास भावसार, सुखलाल मन्सुरी, योगेश अमृतकार, प्रवीण पाठक, प्रकाश अहिरे, ए.बी. भामरे, सुरेश शेलार, एम.व्ही. कुवर, बी.एस. सूर्यवंशी, पी.एल. देवरे, संजय पवार, प्रकाश पानपाटील, वैशाली देसले, कैलास नेरकर आदींसह नागरिक उपस्थित होते. केदाभाऊ महिरे व हर्षाली काकुळते यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सोमदत्त मुंजवाडकर यांनी आभार मानले.

फोटो - १८ रोटरी क्लब देवमामलेदार

सटाणा येथील रोटरी क्लब ऑफ देवमामलेदारच्या नूतन अध्यक्षपदाचा पदभार सुनील खैरनार यांच्याकडे सुपुर्द करताना प्रीतम ततार, तर सचिवपदाची सूत्रे स्वीकारताना नूतन सचिव संजय देसले.

180721\18nsk_25_18072021_13.jpg

 फोटो - १८ रोटरी देवमामलेदार  सटाणा येथील रोटरी क्लब ऑफ देवमामलेदारच्या नूतन अध्यक्षपदाचा पदभार सुनील खैरणार यांच्याकडे सुपूर्द करताना प्रीतम ततार तर सचिवपदाची सूत्रे स्वीकारताना नूतन सचिव संजय देसले.