शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नामको हॉस्पिटलच्या आरएमडी कोविड केअर सेंटरचे उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:07 IST

नाशिक : नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अवघ्या दहा दिवसांत नामको हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली, हे अतिशय ...

नाशिक : नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अवघ्या दहा दिवसांत नामको हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली, हे अतिशय कौतुकास्पद काम आहे. कोरोनाचा रुग्ण बरा होण्यासाठी आवश्यक ती औषधे डॉक्टरांनी द्यावी. परंतु रेमडेसिविरचा वापर आवश्यक असेल तरच करावा शक्यतो त्याचा वापर टाळण्यात यावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज नामको हॉस्पिटल संचलित आर.एम. डी. कोविड केअर सेंटरचे उद‌्घाटन पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार दिलीप बनकर, नामको बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सचिव शशिकांत पारख, माजी आमदार वसंत गिते, विजय साने, हेमंत धात्रक, अशोक साखला, महेश लोढा,चंद्रकांत पारख, प्रकाश दायमा, ज्ञानेश्वर जगताप, रंजन ठाकरे, राजेंद्र डोखळे, जयप्रकाश जातेगावकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने रुग्णसंख्या वाढली असल्याने औषधे व ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तरी देखील आवश्यक त्या सोयी सुविधा शासन, प्रशासन व सेवाभावी संस्था यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात बेडची संख्या कमी असतांना आपण ती मोठ्या प्रमाणात वाढविली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात ज्याला आवश्यक आहे, त्याला प्राधान्याने मदत करून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणात ठेऊन कोविड केअर सेंटरचे काम सुरू ठेवावे. आपल्या पूर्वजांनी कष्टाने सामाजिक कार्य सुरू केलं आहे, ते अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. लॉकडाऊनचा परिणाम अतिशय चांगला होत असून रुग्ण संख्या कमी होण्यास त्याचा अतिशय फायदा होत आहे. पुढची लाट येण्याच्या अगोदर आपण तयारी ठेवावी लागेल. कायमस्वरूपी व्यवस्था झाल्याने याचा भविष्यात देखील उपयोगी ठरणार आहे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

इन्फो

नामको कोविड केअर सेंटर

नामको विश्वस्त मंडळाने अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रशस्त, हवेशीर व आठ बायपॅप व्हेंटिलेटरसह आठ बेडचा अतिदक्षता विभाग व ऑक्सिजन सुविधेसह ४२ बेड कोविड रुग्णांसाठी उभारल्या आहेत. फक्त १० दिवसातच या कोविड केअर सेंटरचे व्हेंटिलेटर्स , बायपॅप मशीन्स , ऑक्सिजन , गॅस पाईपलाईन, बायपॅप, व्हेंटिलेटर्स, मल्टीपॅरा मॉनिटर्स , ईन्फुजन पंप इ . उपलब्ध करून प्रत्येक वाॅर्डात करमणुकीसाठी टी.व्ही, वाय-फाय, टेलिफोन यंत्रणा, पिण्याचे गरम व थंड पाणी, अत्याधुनिक ३ फोल्ड बेड, साईड लॉकर, कार्डिआक टेबल, येण्या व जाण्यासाठी स्वतंत्र प्रशस्त रस्ते या सर्व प्रकारच्या सेवा, सोयीसुविधा शासकीय दरात रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सेवाभावी व तज्ञ ४ कन्सल्टंटस , १५ प्रशिक्षित निवासी डॉक्टर्स , ३४ परिचारिका व सेवक वर्ग यांनी हे सेंटर सुसज्ज करण्यात आले आहे.