शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रधनुष्य-२चे उद्घाटन

By admin | Updated: September 29, 2015 23:39 IST

विजयश्री चुंभळे : बालमृत्यू रोखावे

 नाशिक : पेन्टाव्हॅलंट लसीविषयी मातांना आरोग्य विभागामार्फत माहिती देऊन जिल्ह्यातील बालकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करून बालमृत्यूस आळा घालावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या हस्ते पेन्टाव्हॅलंट लस व मिशन इंद्रधनुष्य फेज-२ या कार्यशाळेचे उद्घाटन व पुस्तिका प्रकाशन झाले. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. कमलाकर लष्करे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी कार्यशाळेची प्रस्तावना विशद केली. नोव्हेंबर २०१५ पासून सुरू होणाऱ्या पेन्टाव्हॅलंट लस आरोग्य विभागामार्फत दिली जाणार आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी मनोगतात सांगितले की, मिशन इंद्रधनुष्य फेज-२ घेणे हे काही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. डॉक्टरांनी पुढाकार घेऊन फेज-२ मध्ये वंचित बालकांचे लसीकरण पूर्ण करतील व १०० टक्के संरक्षित बालक हे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे स्पष्ट केले. याप्रसंगी युनीसेफ मार्फत तयार करण्यात आलेल्या पेन्टाव्हॅलंट लसीबाबत मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यशाळेस डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. दावल, डॉ. युवराज देवरे, डॉ. अरविंद माहुलकर, डॉ. उदय बर्वे, डॉ. बर्वे आदिंसह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)