शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बालरोगतज्ज्ञ परिषदेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:27 IST

भारतात पाच वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण हे जगात सर्वात जास्त असून, ते नियंत्रणात आणण्यासाठी साध्या-सोप्या व अद्ययावत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या अनुभवातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अतिदक्षता विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बी. पी. करु णाकर यांनी केले.

नाशिक : भारतात पाच वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण हे जगात सर्वात जास्त असून, ते नियंत्रणात आणण्यासाठी साध्या-सोप्या व अद्ययावत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या अनुभवातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अतिदक्षता विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बी. पी. करु णाकर यांनी केले.  येथील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये नाशिक चॅप्टरने आयोजित केलेल्या तीनदिवसीय ‘महापेडिक्रीटीकॉन’ या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. करुणाकर बोलत होते. भारतात अतिदक्षता विभाग बालरोग तज्ज्ञांची कमतरता असून ती भरून काढण्यासाठी संघटनेच्या वतीने एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याची माहितीही डॉ. करुणाकर यांनी यावेळी दिली. एक महिना ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांना गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये उपचार करण्याच्या विविध पद्धती व तंत्रज्ञान याविषयीची माहिती यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून देण्यात आली. त्यात डॉ. विनायक पत्की, डॉ. सुचित्रा रणजित, डॉ. धीरेन गुप्ता, डॉ. संजय घोरपडे, डॉ. धालिवाल, डॉ. मधुमती ओतीव यांचा समावेश होता. यावेळी झालेल्या कार्यशाळेत अनेक शोधनिबंध सादर करण्यात आले.  परिषदेच्या यशस्वीतेसाठी नाशिक चॅप्टरच्या अध्यक्ष संगीता बाफना, डॉ. केदार मालवतकर, डॉ. श्याम चौधरी, डॉ. पंकज गाजरे, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. संजय आहेर आदी सहकार्य करित आहेतगंभीर अवस्थेतील बालकांना आयसीयूमध्ये भरती केल्यानंतर त्यांना योग्य ते उपचार तज्ज्ञांमार्फत मिळण्यासाठी या परिषदेतून डॉक्टरांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्याच्या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांच्या अतिदक्षता उपचारांमधील नवनवीन तंत्रज्ञान व उपचार पद्धती यांचे आदान-प्रदान उपयुक्त ठरत असल्याचा दावा आयोजकांनी केला.