मालेगाव : मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस मालेगाव ४५ वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (दि.२२) करण्यात आले. प्रमुख अतिथी रशीद मुख्तार म्हणून उपस्थित होते.भारतीय विद्यार्थी हे जॉबसाठी विदेशात जात असतात; परंतु आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरचे शिक्षण हे मालेगाव तालुक्यात उपलब्ध करून देण्याचे कार्य जेएमईएस शिक्षण संस्था करत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी विदेशात जाण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.विज्ञान प्रकल्प प्रदर्शनामुळे शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेले बदल समाजातील व भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे महत्त्वाचे आहे. याबाबत मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. ए. के. कुरैशी यांनी माहिती दिली. केबीएच विद्यालयाचे प्राचार्य दिनेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपसंचालक नितीन बच्छाव, सचिव जेएमईएस मुंबईचे सचिव राशीद मुख्तार, जि.प. शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, बी.टी. चव्हाण, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, उपशिक्षणाधिकारी के.डी. मोरे, पं. स. सभापती सुवर्णा देसाई, गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी, विज्ञान अध्यापक संघ राज्य अध्यक्ष डी.यू. अहिरे, विज्ञान अध्यापक संघ राज्य उपाध्यक्ष दिनेश पवार, मालेगाव तालुका विज्ञान अध्यापक संघ प्रशांत पाटील उपस्थित होते.मालेगावी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हा भरातील शाळांमधील बालवैज्ञानिकांनी सुमारे ६०० उपकरणांची मांडणी केली होती. आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मांडलेली उपकरणे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विज्ञान प्रदर्शनात उपस्थित विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पसने केली होती.
मालेगावी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:19 IST
मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस मालेगाव ४५ वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (दि.२२) करण्यात आले. प्रमुख अतिथी रशीद मुख्तार म्हणून उपस्थित होते.
मालेगावी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
ठळक मुद्दे६०० उपकरणांची मांडणी : मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस