शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

सटाण्यात व्याख्यानमालेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:47 IST

सटाणा येथील महाविद्यालयात पुणे बहि:शाल मंडळ व पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला संपन्न झाली.

सटाणा : येथील महाविद्यालयात पुणे बहि:शाल मंडळ व पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला संपन्न झाली. बहि:शाल शिक्षण विभागाच्या डॉ. दीपा कुचेकर यांनी व्याख्यानमाला आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी आलेल्या वक्त्यांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, बहि:शाल या शब्दाचा अर्थच शाळाबाहेरील शिक्षण असा आहे. अर्थातच ही ज्ञानाची गंगा समाजापर्यंत घेऊन जाणे अपेक्षित आहे. एकूण सामाजिक विकासासाठी अनौपचारिक शिक्षणाचीसुद्धा गरज असते. ही गरज ओळखून विद्यापीठाने संत गाडगेबाबा नागरिक व्याख्यानमाला सुरू केली. ज्यामध्ये वेगवेगळ्या ज्ञानपैलूंवर प्रकाश टाकला जातो.पहिले पुष्प प्रा. राजाराम मुंगसे यांनी गुंफले त्यांचा विषय रसास्वाद हा होता. केदुपंत भालेराव यांनी मनोरंजनातून तरुणाई या विषयावर गुंफले. ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी समाजात कुटुंबात वावरताना तरुणांशी मनोरंजनातून संवाद साधण्याचे आवाहन केले. यात व्याख्यानमालेत जिभाऊ सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, नेरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी प्रा. नीलेश पाटील, डॉ. दीपा कचेकर, प्रा. धनंजय पंडित, प्रा. लक्ष्मण सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले.वार्धक्यात मनुष्याजवळ सर्व जीवनानुभव असतात. त्या जीवनानुभवांचा समाजाला, कुटुंबाला उपयोग व्हावा यासाठी तरु णांशी संवाद साधताना जर हसत खेळत सहजपणे संवाद साधला तर तरु णपिढी निश्चितच ज्येष्ठांचे अनुभव ग्रहण करते. शरीराच्या छोट्या-छोट्या दुखण्यांना उगाच कुरवाळत बसू नये. शक्यतो आपल्या आर्थिक गरजा स्वत: भागवाव्यात.तिसरे पुष्प सय्यद इलियास मुनाबभाई यांनी ‘ज्येष्ठ नागरिक एक समर्पित जीवन’ विषयावर गुंफले. ते म्हणाले की, आधुनिक काळात जरी सोयीसुविधा वाढलेल्या आहेत; पण माणसांमधील आपुलकी कमी होत आहे. समाज व कुटुंबासाठी ज्येष्ठांनी समर्पित जीवन जगले पाहिजे. कुटुंबात शांतता कशी टिकून राहील याकडे ज्येष्ठांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. यावेळी सय्यद यांनी आयुर्वेदिक हर्बल उत्पादनांचीदेखील माहिती दिली.

टॅग्स :cultureसांस्कृतिक