शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव महाविद्यालयात ज्ञान-विज्ञान वाचन चळवळीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 16:50 IST

पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ विभागाच्या ज्ञान-विज्ञान वाचन चळवळीचे उद्घाटन अमेय शौचे यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देमागील वर्षापासून ज्ञान-विज्ञान वाचन चळवळ हा एक वेगळा उपक्र म बहि:शाल शिक्षण मंडळ विभागाने सुरू केला आहे. या उपक्र मात विद्यापीठाने दिलेल्या यादीतील एक ग्रंथ निवडून ग्रंथ अन्वेषक ग्रंथाच्या सद्यस्थितीची सांगड घालून अन्वेषण करतो. तसेच विद्यार्थ्यांच्या मनात

पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ विभागाच्या ज्ञान-विज्ञान वाचन चळवळीचे उद्घाटन अमेय शौचे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या गाजलेल्या पानिपत कादंबरीची अनेक वैशिष्ट्ये सांगत ही कादंबरी आजच्या काळात समाज जीवनासाठी कशी उपयुक्त आहे हे त्यांनी विशद केले.उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.डब्ल्यू. दाते, जोंधळे, सोरटे, डहाळे, गायकवाड, बिन्नोर, निकम, ज्ञानोबा ढगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नारायण शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी व्याख्यानमालेची गरज व उद्देश स्पष्ट केले.आज पहिले पुष्प गुंफण्यासाठी आलेले वक्ते प्रा. अमेय शौचे यांनी पानिपतचे युद्ध हे मराठ्यांच्या इतिहासात मराठ्यांनी दाखविलेले शौर्य, धैर्य, पराक्र म याचे ज्वलंत उदाहरण आहे. पानिपतमधून आपण सर्वांनी स्वत:ला शिस्त लावण्याचा धडा घ्यायला हवा. यावेळी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली होती. जिज्ञासू विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून विषयाबाबत अधिक माहिती जाणून घेतली. कार्यक्र माच्या शेवटी आभार सीताराम निकम यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानोबा ढगे यांनी केले.