नाशिक : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या येथील उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे उद्घाटन उद्या (दि. ७) दुपारी २.३० वाजता प्रख्यात अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांच्या हस्ते होणार आहे. शालिमार येथील शालिमार प्लाझा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा कार्यक्रम होणार आहे.चित्रपट महामंडळाच्या विभागीय कार्यालयासाठी जागा मिळवण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होते. अखेर खासदार हेमंत गोडसे यांनीच यासाठी गाळा उपलब्ध करून दिला आहे. उद्घाटन कार्यक्रमाला चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तथा अभिनेते विजय पाटकर, खासदार गोडसे यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार बबन घोलप, महापौर अशोक मुर्तडक, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगनाथन, पोलीस अधीक्षक संजय मोहिते आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे श्याम लोंढे, अरुण रहाणे यांनी कळवले आहे. (प्रतिनिधी)
चित्रपट महामंडळ कार्यालयाचे आज उद्घाटन
By admin | Updated: November 6, 2015 21:40 IST