नाशिक : पांडवलेणीच्या पार्श्वभूमीवर, मावळत्या सूर्यकिरणात व आल्हाददायक वातावरणामध्ये विसा संस्थेच्या वतीने आयोजित ‘एक्स्प्रेस इन रॅली आॅफ नाशिक’चे उपस्थितांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आज उद्घाटन झाले . सायंकाळी ६ वाजता हॉटेल एक्स्प्रेस इन येथे झालेल्या कार्यक्रमात एक्स्प्रेस इन ग्रुपचे डेरिल बर्कले, एक्साइड इंडस्ट्रिजचे मनीष पाटोळे, रेड एफएमचे संजीव जिंदल, सुला वाइन यार्डचे अगरवाल व उपस्थितांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखविण्यात आला़ यावेळी सहभागी स्पर्धक ांच्या गाड्यांची रॅली काढण्यात आली होती़ रॅलीमध्ये यावर्षी मोटार स्पोटर््सशी संबंध नसलेल्या अशा ४० पेक्षा जास्त जोड्या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. यामध्ये आई-मुलगी, आई-मुलगा, वडील-मुलगी, भाऊ-भाऊ आणि नवरा-बायको अशा जोड्या उतरल्या आहेत. यंदा या रॅलीत स्त्रियांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे़ अनुभवी स्पर्धकांमध्ये विसाचे अध्यक्ष अश्विन पंडित, माजी विजेता परितोष कोहोक, कौस्तुभ मच्छे, नाशिकचा खेळाडू आदित्य धीवर यांचा सहभाग आहे. आपल्या अनुभवाचा फायदा नवीन स्पर्धकांना मिळावा यासाठी हे सगळे वेगळ्या जोडीदाराबरोबर स्पर्धेत उतरले आहेत. रविवारी (दि़ २८) सकाळी एक्स्प्रेस इन येथून सकाळी ८ वाजता स्पर्धेची खरी सुरु वात होणार आहे.
एक्स्प्रेस रॅलीचे उद्घाटन
By admin | Updated: September 28, 2014 00:40 IST