पंचवटी : दिंडोरी रोडवरील जय बालाजी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, या प्रकल्पाचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या वतीने बालाजीनगर, तसेच कलानगर भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अशोक मुर्तडक, संस्थेचे संस्थापक भालचंद्र पवार, नगरसेवक गणेश चव्हाण, पंचवटीचे पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे, नरेंद्र पिंगळे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. परिसरातील वाढत्या चोऱ्या, तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण बसावे व पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहचता यावे यासाठी संस्थेने पुढाकार घेऊन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार दोन भागात कॅमेरे बसविले आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी पद्मावती महिला मंडळ, बालाजी मित्रमंडळ, बालाजी राजे फाउंडेशन, महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक मंच, सिद्धिविनायक मित्रमंडळाचे पदाधिकारी आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
दिंडोरी रोडला सीसीटीव्ही प्रकल्पाचे उद्घाटन
By admin | Updated: December 1, 2015 22:36 IST