शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये ग्रामसेवकाच्या घरावर दगडफेक करत गावगुंडांकडून जबर मारहाण

By अझहर शेख | Updated: March 4, 2024 15:42 IST

याप्रकरणी काही दंगलखोरांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

संदीप झिरवाळ

पंचवटी : म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवर असलेल्या चाणक्यपुरी सोसायटीत गावगुंडांनी धुमाकूळ घालत कारची तोडफोड करत दंगल घडविल्याची घटना घडली. एका ग्रामसेवकाच्या घरावर दगडफेक करत त्याला बेदम मारहाण करत शनिवारी (दि.२) रात्री धिंगाणा घातल्याचे उघडकीस आले आहे. ग्रामसेवक विजय तुकाराम पवार (४०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

म्हसरूळ पोलिसांच्या हद्दीतील चाणक्यपुरी सोसायटीत दिंडोरी तालुक्यात बाडगीचा पाडा येथील ग्रामसेवक असलेले पवार हे वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री याच परिसरात राहणाऱ्या काही गावगुंडांच्या टोळक्याने एका वाहनाची काच फोडली त्यावरून पवार समजूत काढण्यासाठी गेले असता, त्यांनी त्याचा राग धरून त्यांना दगडाने बेदम मारहाण केली. यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आरडाओरड करत त्यांच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत पवार यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून संशयित आरोपी सुमित शाह, अर्जुन कतोरे व त्याचे इतर तीन ते चार साथीदार यांच्यावर दंगल घडवून आणणे, तसेच बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही दंगलखोरांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्नचाणक्यपुरी सोसायटीच्या परिसरात राहणाऱ्या संशयित आरोपींची तसेच इतर काही जण परिसरात दहशत असून याच टोळीतील अनेक जण रात्री इमारतीच्या परिसरात खुलेआम मद्यपान करत रात्री उशिरापर्यंत बसलेले असतात. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या संशयितांमुळे सोसायटीतील इतर रहिवासी सदस्य गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चाणक्यपुरी सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.