शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 15:18 IST

सुरगाणा : अमरावतीच्या बोरगाव मंजूजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नाशिक विभागातील संघ, सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, गुरुवारी (दि.२८) संध्याकाळी जखमींना योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. या अपघातातून बचावलेल्या खेळाडूंनी स्पर्धेतील उपान्त्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.

ठळक मुद्दे अंतिम फेरीत धडक : अपघातातून बचावलेल्या खेळाडूंनी जिंकला सामना

सुरगाणा : अमरावतीच्या बोरगाव मंजूजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नाशिक विभागातील संघ, सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, गुरुवारी (दि.२८) संध्याकाळी जखमींना योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. या अपघातातून बचावलेल्या खेळाडूंनी स्पर्धेतील उपान्त्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील खा- खो चा संघ अमरावती येथे राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन जीपमधून जात असताना बोरगाव मंजूजवळ खेळाडूंच्या एका जीपला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली होती. त्यामुळे झालेल्या अपघातात इयत्ता आठवीत शिकणारे विद्यार्थी कल्पेश सहारे (रा. धामणकुंड), प्रभाकर धूम (हातरु ंडी), तर शिक्षक टी.आर. गावित, एम.डी. पवार, जीप चालक सुरेश गावित (अलंगुण) हे जखमी झाले होते. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या पाच जखमींवर उपचार करण्यात आले. सद्यस्थितीत या सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांच्यासोबत असलेले क्रीडाशिक्षक एन. एस. तायडे यांनी दिली.या अपघातात सुखरूप असलेल्या उर्वरित खेळाडूंनी स्पर्धेत उत्तम खेळ केला. दडपण असूनही या खेळाडूंनी अमरावती विरोधात असलेला पहिलाच सामना अलंगुण संघाने म्हणजे नाशिक विभागाने दोन गुणांनी विजय संपादन केला. त्यानंतर सेमी फायनलमध्ये मुंबई संघाविरु द्ध दणदणीत विजय संपादन केला असून, शुक्रवारी (दि. २९) लातूर संघाविरु द्ध अंतिम फेरीचा सामना होणार आहे. मोठा अपघात होऊनही या खेळाडूंनी अपघाताचे दडपण न ठेवता अंतिम सामन्यापर्यंत बाजी मारलीआहे.अलंगुण येथील आदर्श समता शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक व माजी आमदार जे.पी. गावित यांचे सुपुत्र हिरामण गावित यांना अपघाताचे वृत्त समजताच थेट अमरावतीमधील अकोला गाठून अपघातातील सर्वांची आपुलकीने विचारपूस केली. हिरामण गावित यांच्यासह प्राचार्य के. एल. वाघचौरे, शिक्षक एन.जी. लांडगे, रामभाऊ थोरात, बाळू गावित, एन.एस. तायडे हे त्यांच्यासोबत असून, रु ग्णालयातून पाचही जणांना सोडण्यात आल्यानंतर त्यांना घरी घेऊन निघाले होते.अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अकोला प्रकल्प अधिकारी हिवाळे तसेच जिल्हा क्र ीडा अधिकारी यांनी रु ग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.उर्वरित सर्व मुले सुखरूप असून, अमरावती येथे स्पर्धेत खेळत आहे. चिंतामण चौधरी (रा. बाफळून), मच्छिंद्र वाघमारे (रा. कुकुडमुंडा), श्याम गायकवाड (रा. कोठूला), किरण जाधव (रा. तोरडोंगरी), रोशन सहारे (धामणकुंड), उत्तम गवळी (गाळबारी), चेतन चौधरी (धुरापाडा), कौशिक चौधरी (बाफळून), श्याम गायकवाड (वांगण), नीलेश भुसारे (तोरडोंगरी) अशी त्यांची नावे आहेत.