शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:52 IST

जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांच्यावर वैद्यकीय पथकाचे बारकाईने लक्ष आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, कोणतीही गुंतागुंत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविलगीकरण कक्षात उपचार : संपर्कात आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरु

नाशिक : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांच्यावर वैद्यकीय पथकाचे बारकाईने लक्ष आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, कोणतीही गुंतागुंत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता, तर सोमवारी नाशिक शहरातील मध्यवर्ती एका उच्चभ्रू भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. या दोन्ही रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संभाव्य सर्वांचीच वैद्यकीय तपासणी केली जात असून, काहींचा शोध सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या दोन झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, सर्वच प्रकारच्या हालचालींवर यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. दहा दिवसांपूर्वी ग्रामीण भागात सापडलेल्या बाधित रुग्णावर सुरू असलेल्या उपचारामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झालेली आहे. आता आणखी एका रुग्णाची भर पडली असली तर हे दोन्ही रुग्ण स्थिर असून, उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत.दरम्यान, शहरात आढळून आलेला कोरोनाबाधित रुग्ण राहात असलेला संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, परिसरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीला प्रारंभ करण्यात आला आहे. संबंधिताच्या कुटुंबातील व्यक्तींचीदेखील वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. परिसरातील नागरिकांकडून वैद्यकीय पथकाला प्रतिसाद दिला जात आहे. नागरिक स्वत:हून उपचारासाठी पुढे येत असल्याची सकारात्मक बाब याठिकाणी दिसून आली. स्थानिक नागरिकांनी वैद्यकीय पथकाला संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी केली असून, तसे आवाहन त्यांनी परिसरातील सोसायटी, कॉलनीतील नागरिकांनादेखील केले आहे.आंतरराष्ट्रीय निर्देशानुसार एकदा पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या थुंकीच्या नमुन्याची दोन वेळा तपासणी करावी लागते. त्यानुसार बुधवारी पहिल्यांदा त्या रुग्णाच्या नमुन्याची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा नमुन्याची तपासणी केली जाऊन दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्याबाबतची अधिकृत घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली.पहिल्या कोरोनाबाधिताच्या नमुन्याची आज फेरतपासणीजिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरलेल्या व्यक्तीच्या प्रकृतीत समाधानकारक प्रगती होत असून, या रुग्णाच्या पहिल्या फेरतपासणीसाठी बुधवारी त्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. निफाड तालुक्यातील या व्यक्तीच्या प्रकृतीत गत दहा दिवसांपासून चांगली प्रगती होत आहे. त्याच्यावर उपचार करणाºया डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी गत आठवड्याच्या तुलनेत त्याची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी होणारी त्याच्या नमुन्याची तपासणी ही नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तो रुग्ण आता सामान्य व्यक्तीप्रमाणे श्वसन करीत असून त्याला कोणताही कृत्रिम श्वासोच्छ्वास लावण्यात आलेला नाही. आहार-विहारातदेखील त्याने समाधानकारक प्रगती साधली असल्याने बुधवारी होणारी त्याच्या नमुन्याची फेरतपासणी नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नाशिकमधील तज्ज्ञ डॉक्टर्सनी राज्य आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अत्यंत प्रभावीपणे त्याच्यावर उपचार केले. त्या सर्व बाबींचा परिणाम म्हणूनच पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णावर अत्यंत वेगाने सकारात्मक बदल घडून आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य