शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

‘सुधारणा पर्व’; भरत जाधवकडून प्रशंसा

By admin | Updated: July 29, 2015 00:03 IST

‘सुधारणा पर्व’; भरत जाधवकडून प्रशंसा

कालिदास कलामंदिर : सोनवणे यांचा पुढाकार; मूलभूत कामांना प्राधान्यनाशिक : दीड-दोन महिन्यापूर्वी महाकवी कालिदास कलामंदिरातील सोयी-सुविधांविषयी अभिनेता भरत जाधव याने नाराजी प्रगट केल्यानंतर जागचे हललेल्या पालिका प्रशासनाकडून कालिदासमध्ये मूलभूत कामांना प्राधान्य देत सोयी-सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी पुढाकार घेऊन तडकाफडकी घेतलेल्या काही कठोर निर्णयांमुळे कालिदासमध्ये सुधारणा पर्वास प्रारंभ झाल्याने नाटकानिमित्त आलेल्या अभिनेता भरत जाधव यांनी कामांबाबत प्रशंसा करत समाधान व्यक्त केले.महाकवी कालिदास कलमंदिरातील असुविधा आणि समस्यांविषयी अभिनेता भरत जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी कालिदासमध्ये धाव घेत जाधव यांची समजूत काढत महिनाभरात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर जीवनकुमार सोनवणे यांनी ‘मिशन कालिदास’ राबवत शहरातील मान्यवर कलावंत, नाट्य परिषदेचे पदाधिकारी यांच्यासमवेत चर्चा करून कालिदासमधील अडचणी जाणून घेतल्या होत्या. यावेळी बऱ्याच तक्रारींवरुन अतिरिक्त आयुक्तांनी कालिदासचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांना तडकाफडकी निलंबित केले आणि त्यांच्या जागेवर प्रकाश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर कालिदासमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात करण्यात आली. आता कालिदासमधील अतिथीगृहाची स्वच्छता करण्यात येऊन रंगरंगोटी करण्यात येत असून, गाद्या-उशा बदलण्यात आल्या आहेत. मेकअप रुममध्येही सुधारणा करण्यात आली आहे. तुटलेले दरवाजे बदलण्यात आले आहेत. कालिदासच्या तळमजल्यावर साचलेले भंगारही हटविण्यात आले असून, त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कलावंतांसाठी भोजनाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. येत्या एक-दोन दिवसात त्याठिकाणी डायनिंग टेबल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कलावंतांच्या भोजनासाठी कायमस्वरुपी सुविधा कालिदासच्या गच्चीवर डोम टाकून उपलब्ध करून दिली जाणार आहे. रंगमंचावरीलही त्रुटी दूर करण्यावर भर दिला जात असून, लवकरच एक हजार वॅटस्चे दिवे बसविले जाणार आहेत. कालिदासमधील ही सुधारणा पाहून रविवारी एका नाटकाच्या ‘चॅरिटी शो’साठी आलेल्या भरत जाधवने समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)