शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित निर्णय : पुढीलवर्षी चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा असेल तरच सवलत विद्यार्थ्यांना तूर्तास दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:27 IST

नाशिक : इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात.

नाशिक : इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. मात्र गुणदान पद्धत आणि यासंदर्भातील अटींविषयी प्रचंड तक्रारी आल्यानंतर आता शासनाने सुधारित निर्णय घेतला असून, सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थी निव्वळ इंटरमिजिएट उत्तीर्ण असला तरी त्यास सवलतीचे गुण मिळणार आहे. मात्र ही सवलत केवळ एकाच वर्षासाठी असून, पुढीलवर्षी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जात असल्याने निकालाचा फुगवटा वाढल्याची ओरड होते. शिक्षणक्षेत्रातून तर याविषयी संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. असे असले तरी बालमानसशास्त्र आणि मुलांमधील आक्रमकता यांचाही विचार झाला पाहिजे, अशी भूमिका बालमानसशास्त्रज्ञांनी मांडल्यामुळे सवलतीच्या गुणांबाबत विचार करताना शिक्षण विभागाला सावध भूमिका घ्यावी लागत आहे. कलाक्षेत्राची सेवा करणाºया दहावीच्या विद्यार्थ्याला त्याच्या कौशल्याचे गुण मिळावेत म्हणून कलाक्षेत्राशी निगडित विद्यार्थ्याला दहावीत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र असे करताना काही अटी लादण्यात आल्या होत्या. त्यास कलाशिक्षकांच्या संघटनांनी वारंवार विरोध करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार या निर्णयात काहीअंशी बदल करण्यात आले आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निर्णयानुसार ‘एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय विद्यार्थ्याला इंटरमिजीएट ड्रॉर्इंग परीक्षेचे अतिरिक्त गुण दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु यात आता बदल करण्यात आला असून केवळ इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यालाही सात गुण दिले जाणार आहे. एलिमेंटरी परीक्षा न देताही आता विद्यार्थी इंटरमिजीएटला अतिरिक्त गुणांचा लाभ होऊ शकतो. मात्र हा निर्णय केवळ एकाच वर्षासाठी ठेवण्यात आला असून पुढीलवर्षी म्हणजेच २०१९ मार्च महिन्याच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.