शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधी सेवा सुधारा, मग करा दरवाढीचा विचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:36 IST

वीज महामंडळ लवकरच वीज दरवाढ करण्याच्या पवित्र्यात आहे. वीज दरवाढ जरूर करावी; मात्र ती करण्याआधी मंडळाने आपली सेवा सुधारणे, त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.

नाशिक : वीज महामंडळ लवकरच वीज दरवाढ करण्याच्या पवित्र्यात आहे. वीज दरवाढ जरूर करावी; मात्र ती करण्याआधी मंडळाने आपली सेवा सुधारणे, त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.  त्रुटींची भरपाई करताना त्याचा भार सातत्याने ग्राहकांवर टाकला जात आहे. त्याऐवजी इतर पर्यायांचा मंडळाने विचार करावा, वीज निर्मितीमधील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा अशा भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. याबाबत ग्राहक पंचायत समिती सदस्य, सर्वसामान्य नागरिक, माजी  मुख्य अभियंता यांच्याशी साधलेला हा संवाद.वीज दरवाढ ही नैमित्तिक गोष्ट बनली आहे. दरवाढ करण्याआधी पुरवठा कसा आहे? सेवा कशी आहे? वसुली पूर्णपणे होते का?, गैरप्रकारांचे काय? या प्रश्नांची उत्तरे मंडळाने द्यावीत. वीजचोरी कमी व्हायचे नाव घेत नाही. असे असताना शासनाने वीज दरवाढीचा विचारही करू नये. - दिलीप फडकेवीज दरवाढ या गोष्टीला समर्थनच असू शकत नाही. ही ग्राहक हिताविरोधी कृती आहे. कारण आधीच विजेचे दर जास्त आहे. त्यात खोटे हिशेब, अवास्तव बिल या अनुचित प्रथांमुळे ग्राहक भरडला जात आहे. शेतकऱ्यांना अंदाजे बिल देऊन त्याची तूट सर्वसामान्य ग्राहकांकडून दरवाढीच्या माध्यमातून वसूल केली जात आहे. ४० टक्के कृषी ग्राहकांना अंदाजपंचे बिल दिले जाते. - विलास देवळेवीज खरेदीचे दर कमी होत असताना वीज दरवाढ का केली जात आहे हे समजत नाही. कृषी क्षेत्राला अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्षात आलेले उत्पन्न पाहता जास्त महसूल आलेला दिसतो आहे; मात्र प्रत्यक्ष थकबाकी खूप आहे. वसुलीचे गांभीर्य दिसत नाही. प्रस्तावित दरवाढीत कृषिपंपांची दरवाढ खूपच जास्त आहे. गळती कमी झाली आहे तरीही वीज दरवाढ होते आहे हे चुकीचे आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी भरडले जाणार आहेत.  - अरविंद गडाख, माजी मुख्य अभियंता, वीज महामंडळ

टॅग्स :electricityवीज