शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्तन सुधारा अन‌् मोक्का टाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST

पोलीस आयुक्तालयांतर्गत गुन्हेगार सुधार योजना-२०२१ राबविण्यास मंगळवारी (दि.२२) सुरुवात करण्यात आली. या औचित्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात संध्याकाळी झालेल्या ...

पोलीस आयुक्तालयांतर्गत गुन्हेगार सुधार योजना-२०२१ राबविण्यास मंगळवारी (दि.२२) सुरुवात करण्यात आली. या औचित्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात पाण्डेय यांनी उपस्थित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्या खास शैलीत सुधारण्याची संधी असल्याचे बजावून सांगितले. यावेळी उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त नवलनाथ तांबे, समीर शेख, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, अनिल शिंदे, कमलाकर जाधव यांच्यासह आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, पाण्डेय म्हणाले, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गुन्हेगार सुधार योजनेकडे एक संधी म्हणून बघावे आणि आपले वर्तन सुधारून स्वत:सह कुटुंबीयांचेही आयुष्य सुखी, आनंदी करण्यावर भर द्यावा. यावेळी उपस्थित गुन्हेगारांनी आपल्या जीवनातील व्यथा मांडल्या. यावेळी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २६, उपनगरचे १६, देवळाली कॅम्पचे २० असे एकूण ६२ गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले व्यक्तींनी हजेरी लावली.

--इन्फो--

पालकांची कळकळ लक्षात घ्या

बहुतांश गुन्हेगारांचे कुटुंबीयांनी माझी भेट घेत आमच्या मुलांना सुधारण्याची संधी द्यावी, असे पोटतिडकीने सांगत होते. त्यामुळे कायद्याच्या अभ्यास करत ही योजना राबविण्याचा प्रयोग सुरू केल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचे वर्तन सुधारणा करणेदेखील पोलिसांचे एक कर्तव्य असून पोलिसांनी पुन्हा त्यादिशेने एक पाऊल टाकले आहे. त्यामुळे गु्न्हेगारीमध्ये अनावधानाने आलेले किंवा आणले गेलेल्या गुन्हेगारांनी कायमस्वरूपी यामधून पावले मागे घ्यावे, असेही ते म्हणाले.

===Photopath===

220621\03210230365722nsk_43_22062021_13.jpg

===Caption===

गुन्हेगार सुधार योजना