शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

निफाड शहरासाठी पर्यायी विद्युत व्यवस्था कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:52 IST

लॉकडाउनच्या काळामध्ये गेल्या १३ वर्षांपासून बंद असलेली वीजवाहिनी सुरू करून निफाड शहराला खंडित वीजपुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रलंबित प्रश्न सुटला । बंद पडलेली पर्यायी वीजवाहिनी

एस. एन. चकोर ।निफाड : लॉकडाउनच्या काळामध्ये गेल्या १३ वर्षांपासून बंद असलेली वीजवाहिनी सुरू करून निफाड शहराला खंडित वीजपुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे.ही जुनी वीजवाहिनी दुरुस्त झाल्याने कसबे सुकेणे उपकेंद्रातून येणाऱ्या वाहिनीवर अचानक बिघाड झाल्यास निफाड शहराला आता तातडीने रानवड वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था निर्माण झाली आहे.निफाड हे तालुक्याचे गाव असून, येथे अनेक शासकीय कार्यालय आहेत. त्याचप्रमाणे उपबाजार आवार, उपजिल्हा रुग्णालय, शाळा, महाविद्यालये, आयटीआय, हॉस्पिटल, शीतगृहे आहेत. त्यामुळे या शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्यास शहराचे कामकाज मोठ्या प्रमाणात ठप्प होत होते.कसबे सुकेणे येथील वीज उपकेंद्रातून कुंदेवाडी उपकेंद्रास वीजपुरवठा होतो. त्यानंतर कुंदेवाडी वीज उपकेंद्रातून निफाड शहरास वीजपुरवठा केला जातो. कसबे सुकेणे उपकेंद्रातून आलेल्या वीजवाहिनीत तांत्रिक अडचणी निर्माण होऊन वा बिघाड झाल्यास निफाड शहराचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता व निफाडकरांना अंधारात राहावे लागत होते. त्यामुळे वीज वितरण कंपनीची दुरुस्तीसाठी धावपळ होत होती.दुसरीकडे रानवड उपकेंद्रातून निघणारी व कुंदेवाडी उपकेंद्राला जोडणारी जुनी विद्युत वाहिनी गेल्या १३ वर्षांपासून अतिशय जीर्ण असून, बंद अवस्थेत होती. रानवड उपकेंद्र ते कुंदेवाडी उपकेंद्र या दरम्यानच्या या वीज वाहिनीमध्ये खांब, तारा तुटलेल्या व जीर्ण झालेल्या, पीन व डिस्क इन्सुलेटर तुटलेल्या अवस्थेत होते. जर ही बंद असलेली वीजवाहिनी दुरुस्त केली तर त्याद्वारे कुंदेवाडी उपकेंद्राला व निफाड शहराला पर्यायी वीजपुरवठा करता येईल काय? यावर नाशिक शहर मंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड, निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे यांनी विचार सुरू केला. तशी ही सर्व दुरुस्ती आव्हानात्मक आणि प्रचंड परिश्रमाची होती; परंतु हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. गेल्या १३ वर्षांपासून बंद पडलेल्या वाहिनीची दुरुस्ती करायची आणि लॉकडाउनच्या काळामध्ये हे काम पूर्ण करून दाखविले.यासाठी बंकट सुरवसे, आनंदा मोरे, निफाड शहर अभियंता गणेश कुशारे, कंत्राटदार व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी लागणाºया साहित्याची ने-आण करण्यासाठी वाहने मिळवताना कसरत करावी लागली त्यातच सूर्य आग ओकत असताना प्रचंड मेहनतीने हे काम पूर्ण केले. सदर दुरु स्ती करताना वीज वितरण कंपनीकडे उपलब्ध असलेल्या साधन-सामग्रीचा वापर करून कंपनीची आर्थिक बचत केली.

निफाड शहराचा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमचा सोडवावा, असे मी मनोमन ठरवले. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यास यश आले. ही बंद पडलेली वीजवाहिनी दुरु स्त झाल्याने निफाड शहराची वर्षानुवर्षाची समस्या सुटल्याचे मला समाधान मिळाले आहे.- बंकट सुरवसे, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, निफाड

टॅग्स :mahavitaranमहावितरण