शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

जिल्ह्यातील १९ लाख बालकांचे लसीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:10 IST

बालकांना जीवघेणा ठरू पाहणाऱ्या गोवर आजारापासून संरक्षणासाठी जिल्ह्यातील १९ लाखांहून अधिक बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात येणार असून, या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व यंत्रणांनी सहभागी व्हावे आणि लसीकरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.

नाशिक : बालकांना जीवघेणा ठरू पाहणाऱ्या गोवर आजारापासून संरक्षणासाठी जिल्ह्यातील १९ लाखांहून अधिक बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात येणार असून, या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व यंत्रणांनी सहभागी व्हावे आणि लसीकरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जगात २०१६ मध्ये गोवरमुळे १ लाख ३४ हजार बालके मृत्युमुखी पडली असून, त्यातील ४९ हजार बालके भारतातील आहेत. या आजारामुळे बालकांवर अंधत्व, पंगुत्व, डायरिया, निमोनिया आदी परिणाम होऊ शकतो. रुबेलाचा संसर्ग गर्भवती मातेस झाल्यास अर्भक मृत्यू किंवा जन्माला येणाºया बालकात जन्मजात दोष उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे या आजाराचा नायनाट करण्यासाठी जिल्ह्यातील १९ लाख २३ हजार ९७० बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यापैकी १ लाख ९३ हजार ८२२ मालेगाव महापालिका, ४ लाख ९० हजार २८८ नाशिक महापालिका आणि ११ लाख ४० हजार ४४८ ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत २० राज्यांतील १२ कोटी बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, सहायक जिल्हाधिकारी पंकज आशियाना, कुमार आशीर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. कमलाकर लष्करे आदी उपस्थित होते.नागरिकांचे  करणार प्रबोधनजिल्हाधिकारी राधाकृष्णन पुढे म्हणाले, प्रथमच लसीकरण इंजेक्शनद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांचे प्रबोधन करण्यावर विशेष भर देण्यात यावा. मोठ्या संख्येने लसीकरण होणार असल्याने तालुकानिहाय सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा. शाळांमधून पालकांच्या बैठका घेऊन त्यांना लसीकरणाबाबत माहिती देण्यात यावी. तालुका स्तरावर आवश्यक मनुष्यबळ, लसींचा पुरवठा, आवश्यक साधनसामग्रीबाबत आतापासून नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

टॅग्स :docterडॉक्टरhospitalहॉस्पिटलnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद