शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

नाशिकच्या ‘त्या ’अंध उमेदवारांची तातडीने नियुक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:10 IST

‘मॅट’चे कौशल्य विकास विभागाला आदेश; कलम-१६चे उल्लंघन नको

मुंबई : नियुक्तीसाठी पात्र असतानाही केवळ शासकीय दिरंगाईमुळे विलंब झाला असताना नाशिकच्या अंध उमेदवाराला अपात्र ठरविणाऱ्या शासन आणि महाराष्टÑ लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) महाराष्टÑ प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) फटकार लगावित त्याची तातडीने नियुक्त करण्याचे आदेश दिले. तर अशाच अन्य एका प्रकरणात नियुक्तीबाबत तातडीने अभिप्राय देण्याची सूचना राज्य लोकसेवा आयोगाला नुकतची केली.

प्राधिकरणाचे उपाध्यक्ष प्रविण दीक्षित व सदस्य ए. डी. कारंजकर यांच्या खंडपीठाने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाला त्याबाबतचे आदेश दिले. पात्र उमेदवारांची नियुक्ती टाळणे म्हणजे राज्यघटनेतील कलम-१६ अन्वये दिलेल्या अधिकारांच्या उल्लंघनाचा प्रकार असल्याची गंभीर नोंद त्यांनी निकालपत्रात नमूद केली. नाशिकच्या जितेंद्र जगन्नाथ पाटील व संतोष नाथा साळुंके यांनी आपल्यावरील अन्याबाबाबत याचिका दाखल केली होती. त्यांच्या वतीने अ‍ॅड. किशोर जगदाळे यांनी मांडलेली बाजू खंडपीठाने ग्राह्य धरली.

राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने २०१३ मध्ये कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्गंत येणाºया औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उपप्राचार्य वर्ग-२ च्या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये पूर्ण अंध किंवा कमी उद्दिष्ट असलेल्या प्रवर्गासाठी दोन जागा राखीव होत्या. परीक्षतेतून साळी व कुलकर्णी यांची निवड झाली. मात्र साळी यांची प्राचार्य पदासाठीही निवड झाल्याने ते त्या पदावर नियुक्त झाले. तर कुलकर्णी हे कागदपत्राच्या छाननीत अपात्र ठरले. त्यावर प्रतीक्षा यादीतील क्रमांक एकवरील भादने यांची एका पदावर नियुक्ती झाली, तर दुसºया जागेसाठी विभागाने एमपीएससीकडे विचारणाच केली नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीत द्वितीय स्थानी असलेल्या जितेंद्र पाटील यांनी अखेर २०१६मध्ये आयोगाला पत्र लिहून विचारणा केली. त्यावर प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची ग्राह्यता निकाल जाहीर झाल्यापासून केवळ एक वर्षासाठी असल्याचा नियम दर्शवित त्यांची नियुक्ती होत नसल्याचे कळविण्यात आले. त्याविरुद्ध पाटील यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली. सुनावणीत विभागाने आयोगाकडे तीन वर्षांत रिक्त असलेल्या दुसºया जागेसाठी मागणी पत्रच पाठविले नसल्याचे अ‍ॅड. जगदाळे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या प्रकरणामध्ये उमेदवाराचा कोणताही दोष नसून शासकीय दिरंगाई असल्याचे स्पष्ट झाले.

दुसºया प्रकरणात याच परीक्षेतील खूल्या प्रवर्गातील ७१ जागांसाठी झालेल्या नियुक्तीत संतोष साळुंके हे १३३ गुण मिळवून प्रतीक्षा यादीत होते. त्यांच्याहून २ गुण अधिक मिळविलेल्या अन्य उमेदवाराची पदासाठी नियुक्ती झाली. मात्र त्याच्याकडे कामाचा अनुभव नसल्याने तो अपात्र ठरला. त्यामुळे विभागाने रिक्त जागा भरली नाही. प्रतीक्षा यादीचा कालावधी संपला असला तरी शासनाची चूकअसल्याने साळुंके यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर लोकसेवा आयोगाने तातडीने सरकारला अभिप्राय पाठवावा असे आदेश दिले. दोन्ही प्रकरणात सरकारी वकील म्हणून एस. पी. मंजेकर यांनी काम पाहिले.नियमावली भंगाला कोर्टाकडून प्रतिबंधकोणत्याही नियुक्तीमध्ये गुणवत्ता यादीच्या एक वर्षाच्या कालावधीत आयोगाकडून रिक्त असलेल्या पदासाठी पात्र उमेदवारांची यादी मागविण्याची जबाबदारी विभागाची असते. त्यासाठी उमेदवारांना जबाबदार धरणे म्हणजे राज्य घटनेने कलम-१६ अन्वये दिलेल्या सेवा नियुक्तीच्या नियमावलीचा भंग होता. त्याला कोर्टाने प्रतिबंध घातला.-अ‍ॅड. किशोर जगदाळे, वकील, मॅट