शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:34 IST

येवला : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना शासन स्तरावरून लवकरच मदत दिली जाईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी तालुक्यातील अंदरसूल, धामणगाव येथे वादळाने झालेल्या नुकसानीची गुरुवारी (दि. ४) पाहणी केली.

येवला : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना शासन स्तरावरून लवकरच मदत दिली जाईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी तालुक्यातील अंदरसूल, धामणगाव येथे वादळाने झालेल्या नुकसानीची गुरुवारी (दि. ४) पाहणी केली.येवला तहसील कार्यालय येथे निसर्ग चक्रीवादळ नुकसान, खरीप आढावा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी निसर्गचक्र ीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करूनशासनास अहवाल देण्याचे आदेश दिले. तसेच येवला शहर व तालुक्यात असलेल्या कोरोना रुग्णांचा आढावा घेतला.येवला तालुक्यातील खरीप हंगामाबाबत आढावा घेऊन त्याची सद्यस्थिती शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीककर्ज वाटप, बियाणांची उपलब्धता व पुरवठ्याबाबत नियोजन, खतांची उपलब्धता व पुरवठा याबाबत नियोजन, सिंचनासाठी पाणी आरक्षणाचे नियोजन याचा आढावा घेऊन येवल्यातील पाणीटंचाईबाबत केल्या जाणाºया उपाययोजनांचा आढावा, ३८ गाव व ४१ गाव पाणीपुरवठा योजनांची माहिती घेत वीजपुरवठा व ट्रान्स्फॉर्मरबाबत अडचणी भुजबळ यांनी जाणूनघेऊन संबंधित अधिकाºयांना सूचना दिल्या.बैठकीस प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारूळे, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पाटील, महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी एम.पी. प्रजापती, उपविभागीय अभियंता एस. एम. देवरे, उपअभियंता स.प्र. राजपूत, तालुका कृषी अधिकारी के.ए. नवले, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, अनिल भवारी आदी अधिकारी उपस्थित होते.---------------------कामांची पाहणीयेवला शहरातील संजीवनी मजूर सहकारी संस्था संचलित शिवभोजन केंद्रास पालकमंत्री भुजबळ यांनी अचानक भेट दिली. तसेच येवला प्रशासकीय संकुलात पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणीही केली. दरम्यान, तालुक्यातील नगरसूल येथे पावसाने मोठे नुकसान झाले. आश्रमशाळेचे पत्रे उडाले असून, सोलर यंत्राचे नुकसान झाले. लवकरच शाळा सुरू होणार असून, शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

 

टॅग्स :Nashikनाशिक