शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएतर्फे डॉक्टर दिनाच्या निमित्ताने कोविड योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:11 IST

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे डॉक्टर दिनाच्या निमित्ताने कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. गत दीड वर्षात ...

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे डॉक्टर दिनाच्या निमित्ताने कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. गत दीड वर्षात सर्व जगभर हानी करत असलेल्या कोविड संक्रमणाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून शर्थीचे प्रयत्न करत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत समाजाला या संकटातून यशस्वीरीत्या बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सदस्यांचा तसेच इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.

ऑक्सिजन, औषधांचा अभाव यासह विविध अडचणींचा सामना करत शतकातून एकदा येणाऱ्या या मोठ्या संकटाचा धैर्याने सामना केल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आयएमएतर्फे कौतुक करण्यात आले. खासगी रुग्णालय, महानगरपालिका रुग्णालय आणि शासकीय रुग्णालये येथे काम करणाऱ्या विविध डॉक्टरांचा त्यात समावेश होता. नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. आवेश पलोड, डॉ. अनंत पवार, डॉ. प्रशांत शेटे, डॉ. अजिता साळुंके, डॉक्टर कल्पना कुटे, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. नितीन रावते, डॉ. अनिता हिरे यांचा कोविड सेवेतील योगदानासाठी आयएमए अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैद्यकीय सेवा ही टीमवर्क असते. डॉ प्रेरणा शिंदे, डॉ. शलाका बागूल, डॉ. प्रतिभा बोरसे, डॉ. नितीन चिताळकर, डॉ. कपिल पाळेकर, डॉ. सागर भालेराव, डॉ. पंकज भट, डॉ. प्रीती लुंकड यांनी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.

इन्फो

सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सन्मान

डॉक्टरांच्या बरोबरीनेच हिरिरीने खांद्याला खांदा लावून गेल्या दीड वर्षात लढणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचाही प्रातिनिधिक स्वरूपात उपाध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. उमेश नागापूरकर, डॉ. कविता गाडेकर, सचिव डॉ. विशाल पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नर्सेस दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील नर्सेसचा सत्कार आयएमएच्या वुमन डॉक्टर विंगतर्फे करण्यात आला होता. त्याव्यतिरिक्त वॉर्ड बॉईज, सफाई कर्मचारी, रिसेप्शन, अकाउंटंट, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, शववाहिनी चालक, अमरधाम कर्मचारी, लॅब टेक्निशियन, सिटी स्कॅन टेक्निशियन यांचा सत्कार आयएमएतर्फे करण्यात आला. महानगरपालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या आरएमओ डॉक्टर्सचादेखील सत्कार केला गेला. मराठा विद्या प्रसारक आणि एसएमबीटी या मेडिकल कॉलेजेसमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचादेखील सत्कार आयएमए नाशिकतर्फे या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने करण्यात आला.

फोटो

०४आयएमए सत्कार